टेम्पो परत घेऊन जा, धाराशिवमध्ये पूरग्रस्तांचा संताप; शिंदे, सरनाईकांचे फोटो असलेले मदत कीट नाकारले

मराठवाड्यात अतिवृष्ट झाली असून पीकं पाण्याखाली गेली आहेत. जनावरं वाहून गेली असून रस्ते खचले आहेत. अशा वेळी मिंधे आणि त्यांच्या नेत्यांनी मराठवाड्यात मदत पाठवली आहे. पण या मदतीच्या कीटवर मिंधेंच्या नेत्यांचे फोटो असल्याने संताप व्यक्त होत आहे. हे कीट परत घेऊन जा असे पूरग्रस्त ग्रामस्थांनी म्हटले आहे.

मराठवाड्यात पुराने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी शेतातून मातीही वाहून गेली आहे. अशा वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचे कीट पाठवले आहे. या कीटमध्ये अन्नधान्य, घरात लागणाऱ्या वस्तू, औषधांचा समावेश होता. पण या कीटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो छापण्यात आले आहेत. तीन दिवस झाले इथे कोणी फिरकले नाही आणि त्यात मदतीवर नेत्यांचे फोटो पाहून नागरिक चिडले आहेत. तुमची मदत नको, तुमचे टेम्पो घेऊन जा असे इथले ग्रामस्थ म्हणाले आहेत.

Comments are closed.