पुरात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने जीवन संपवले, एकीकडे उपमुख्यमंत्री पाहणी करत असताना दुसरीकडे शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

धारशिव जिल्ह्यात एकीकडे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक हे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. तर दुसरीकडे भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे एका शेतकर्‍याने पुरात झालेल्या नुकसानीमुळे जीवन संपवले आहे. लक्ष्मण बाबासाहेब पवार (४३) असे या शेतकर्‍याचे नाव आहे.

टेम्पो परत घेऊन जा, धाराशिवमध्ये पूरग्रस्तांचा संताप; शिंदे, सरनाईकांचे फोटो असलेले मदत कीट नाकारले

भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (४३) यांची नदीकाठी जमीन होती. मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टी, नद्यांना आलेल्या पुरामुळे लक्ष्मण पवार यांच्या शेतातील पीक वाहून गेले. यासह पूर्ण जमीन खरवडून गेली होती. त्यांच्या शेतात कांदा तसेच सोयाबीनचे पीक होते. शेतीसाठी त्यांनी ट्रॅक्टरचे कर्ज घेतले होते. आणि वसुलीच्या चिंतेतून हाताश झालेल्या लक्ष्मण बाबासाहेब पवार यांनी शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पाठीमागे पत्नी, ३ मुले, आई, वडील असा परिवार आहे.

लातूर जिल्ह्यात साडे तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान; 210 जनावरांचा मृत्यू, 5 लाख शेतकऱ्यांना आर्थिक फटका

भूम, परंडा तालुक्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. काल या भागाची मंत्री गिरीष महाजन यांनी तर, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रताप सरकनाईक हे पाहणी करत आहेत. या पाहणी पेक्षा शेतकर्‍यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे.

Comments are closed.