Marathwada Floods : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, घरात पूराचे पाणी शिरल्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवमधील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचपार्श्वभूमीवर आज (24 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव आणि इतर मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत.

Comments are closed.