अभिषेक शर्मा फलंदाजीत तर वरुण चक्रवर्ती गोलंदाजीत नंबर-1, हार्दिक पांड्यानं मोठा डाव साधला


आयसीसी टी 20 आय रँकिंग टीम इंडिया: आशिया कप 2025 मध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम आहे. या स्पर्धेत सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या तुफानी फलंदाजीने धुमाकूळ घालत आहे, त्याचे बॅटिंगचे जोरदार प्रदर्शन आता आयसीसीच्या टी-20 क्रमवारीतही दिसत आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीनुसार अभिषेक जगातील नंबर-1 टी-20 फलंदाज म्हणून अव्वल स्थानी कायम आहे.

अभिषेकची धमाकेदार कामगिरी (Abhishek Sharma No. 1 batter ICC T20I Rankings)

अभिषेकने ओमानविरुद्ध गट-सामन्यात 38 धावा तर पाकिस्तानविरुद्ध सुपर-4 मध्ये तडाखेबाज 74 धावा ठोकल्या. त्याच्या या सातत्यपूर्ण खेळीमुळे तो यादीत टॉपवर राहिला आहे. याचबरोबर तिलक वर्मा एक स्थानवर सरकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान तब्बल 31 स्थानांनी झेप घेत 24व्या स्थानी आला आहे.

गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती पहिल्या क्रमांकावर (Varun Chakravarthy No. 1st bowling ICC T20I Rankings)

34 वर्षीय भारतीय स्पिनर वरुण चक्रवर्ती आशिया कपमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. गोलंदाजांच्या यादीत चक्रवर्तीने पहिल्या क्रमांकावर आपली पकड मजबूत केली आहे. आता त्याचे 747 गुण आहेत. न्यूझीलंडचा जेकब डफी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान सहा स्थानांची झेप घेत पुन्हा टॉप-10 मध्ये दाखल झाला आहे.

अष्टपैलूंमध्ये हार्दिक पांड्या नंबर-1 (Hardik Pandya No. 1st all-rounders ICC T20I Rankings)

अष्टपैलूंच्या क्रमवारीतही भारतीय खेळाडूंची ताकद दिसून येते. हार्दिक पांड्या अव्वल स्थानी कायम असून त्याने पाकिस्तानचा अबरार अहमदला मागे टाकले. विशेष म्हणजे, संघ क्रमवारीतही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. मागील आठवड्यात भारताने सर्वच गटांमध्ये फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू आणि संघ क्रमांक-1 स्थान पटकावत इतिहास रचला होता. थोडक्यात सांगायचं तर, आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाचं वर्चस्व पूर्ण जोमात आहे आणि अभिषेक शर्माच्या तडाखेबाज फॉर्ममुळे भारतीय संघाची ताकद अधिकच वाढली आहे.

हे ही वाचा –

Team India Squad For West Indies Test Series : नवा ट्विस्ट! टीम इंडियातून करुण नायरचा पत्ता कट; तब्बल 17 किलो वजन कमी करणाऱ्या मुंबईकराला वेस्ट इंडिजविरुद्ध मिळणार संधी?

आणखी वाचा

Comments are closed.