Latur Flood – भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फडणवीसांचा पाहणी दौरा! शेतकऱ्यांची निवेदने न स्वीकारताच निघून गेले

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथील तेरणा व मांजरा संगमावरील पूर परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. पण फडणवीसांनी भाजप कार्यकर्ते व भाजपप्रणित शेतकऱ्यांना घेऊन आर्ध्या तासात पाहणी दौरा उरकला. आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत त्यांच्या समस्या, निवेदने न स्वीकारताच निघून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात नाराजीचा सूर उमटला.

लातूर जिल्ह्यात साडे तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान; 210 जनावरांचा मृत्यू, 5 लाख शेतकऱ्यांना आर्थिक फटका

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि पूरपरस्थीतीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री येणार असल्यामुळे सदरील पूर आलेल्या संगमाच्या परीसरातील शेतकऱ्यांच्या ठिकाणी इतर भाजप पदाधिकाऱ्यांची नावे टाकली गेली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना प्रवेश नाकारला गेला. तसेच गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच आरती भंडारे यांचेही नाव नव्हते. यामुळे दौऱ्याच्या ठिकाणी त्यांना सुद्धा प्रवेश नाकारला जात होता. मात्र, इतर गावचे भाजपचे सरपंच व पदाधिकारी असलेल्या काही लोकांची यादीत नावे टाकली गेली. इतर शेतकऱ्यांना वगळून पूरस्थितीची पाहणीची नौटंकी करत दौरा उरकला.

औराद शहाजानी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने औराद शहाजानीसह परिसरातील तगरखेडा व मानेजवळगा येथील जवळपास शेकडो शेतकरी पूर परिस्थिती व रस्ता नसूनही पंधरा किलोमीटर अंतरावरून दुसऱ्या गावातून प्रवास करत आले. पण तगरखेडा, ताडमुगळी, हलगरा, बोरसुरी तसेच शिरुर अनंतपाळ तालुक्यातील शेकडो शेतकरी निवेदने घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्यासाठी आले आसतानाही फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी थोडासुद्धा वेळ दिला नाही. शासकीय विश्रामगृहावर थांबण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना सांगण्यात आले. नंतर शेतकऱ्यांना न भेटताच त्यांच्या समस्या न ऐकताच आणि त्यांचे निवेदने न घेताच फक्त अर्ध्या तासात नदीकाठच्या संगमावर जाऊन पाहणीची नौटंकी करत औराद शहाजानीचा दौरा उरकला. त्यामुळे येथे आलेले हजारो शेतकरी नाराज होऊन परत आपापल्या गावी निघून गेले.

टेम्पो परत घेऊन जा, धाराशिवमध्ये पूरग्रस्तांचा संताप; शिंदे, सरनाईकांचे फोटो असलेले मदत कीट नाकारले

कारसा पोहरेगाव बॅरेजेसचे दरवाजे उघडले नाहीत

रेणापूर तालुक्यातील मौजे कारसा पोहरेगाव बॅरेजेसचे दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी तुंबून थेट शेत शिवारातून वाहात आहे. मागील तीन वर्षांपासून या बॅरेजेसचे दरवाजे दुरुस्त करण्याची मागणी केली जात होती. पण ते काम न झाल्याने पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतामध्ये गेले. यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला जबाबदार पाटबंधारे विभाग असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Comments are closed.