Health Tips: कांद्याच्या ‘या’ भागामुळे वाढतो कॅन्सरचा धोका

आपल्या जेवणात कांदा हा हमखास वापरला जातो. स्वयंपाकात कांदा नसेल तर पदार्थाची चव अपुरी वाटते. पण काळे डाग किंवा बुरशी लागलेला कांदा खाल्ल्याने आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, याचा विचार केला आहे का? ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही आजपासून अशा कांद्याचा वापर करणे थांबवाल. (onion black spots cancer risk)

काळे डाग असलेला कांदा किती धोकादायक?
बर्‍याचदा घरात कांद्यावर बुरशी किंवा काळे डाग दिसतात. आपण तो भाग कापून उर्वरित कांदा वापरतो. मात्र ही मोठी चूक आहे. कारण बुरशी अनेकदा डोळ्यांना दिसण्यापेक्षा आत खोलवर पसरलेली असते. त्यामुळे अशा कांद्याचा थोडाही वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरतो.

कोणते आजार होऊ शकतात?
काळे डाग किंवा बुरशी लागलेल्या कांद्यामध्ये मायकोटॉक्सिन्स नावाचं विष तयार होतं. यामुळे अन्नातील ऍलर्जी, उलट्या, अतिसार, पोटदुखी, यकृताचे आजार, दीर्घकाळात कर्करोगाचा धोकावाढू शकतो त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अशा कांद्याचे सेवन टाळणेच योग्य आहे.

अशा कांद्याचे सेवन टाळणेच योग्य आहे.

ताज्या कांद्याचे फायदे
1) ताजे, स्वच्छ कांदे मात्र शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
2) टाईप 2 मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत
3) रक्तदाब संतुलित ठेवतो
4) उन्हाळ्यात उष्माघातापासून संरक्षण
5) शरीराला ऊर्जा आणि थंडावा

कांदे कसे साठवावेत?
कांदे नेहमी थंड, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. फ्रिजमध्ये किंवा दमट जागेत साठवणूक करू नका. पावसाळ्यात कमी प्रमाणात, गरजेनुसार कांदे खरेदी करा. बुरशी लागलेले कांदे लगेच फेकून द्या

स्वयंपाक करताना आपण नेहमी कांद्यावर अवलंबून असतो. पण तो ताजा आहे का, स्वच्छ आहे का हे तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण बुरशी लागलेला कांदा ही केवळ किरकोळ गोष्ट नाही, तर तो आपल्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकतो.

Comments are closed.