Asia Cup: भारत अजूनही आशिया कपमधून बाहेर होऊ शकतो का? आश्चर्यचकित करणारं समीकरण समोर!

भारत हा एकमेव असा देश आहे, ज्या संघाने आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये (Asia Cup 2025) अद्याप एकही सामना हरलेला नाही. ग्रुप स्टेजमध्ये टेबलवर अव्वल राहिल्यानंतर भारतीय टीम फायनलमध्ये जाण्याची सर्वात मोठी दावेदार आहे. सुपर-4 मध्ये पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला 6 विकेटने हरवले होते.

सुपर-4 च्या वेळापत्रकानुसार, टीम इंडियाला अजून 2 सामने खेळायचे आहेत. 24 सप्टेंबरला बांग्लादेशविरुद्ध आणि 26 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध. जर भारत हे दोन्ही सामने हरले, तर फायनलमध्ये जाण्याची त्यांची शक्यता फारच कमी होईल. या दोन्ही सामन्यात हार झाल्यास नेट रन रेट इतर संघांपेक्षा कमी झाल्यामुळे फायनलच्या संपूर्ण आशा संपतील.

भारतीय संघाचं आतापर्यंतच प्रदर्शन पाहता, त्यांची आशिया कपमधून बाहेर पडण्याची शक्यता फार कमी आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 ही सामन्यात त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. सुपर-4 मध्ये उरलेल्या सामन्यात भारत एकही सामना जिंकला, तर त्यांची फायनलमध्ये पोहोचण्याची संधी जवळजवळ निश्चित होईल.

आशिया कप 2025 मध्ये एकूण 8 संघ सहभागी झाले होते. ग्रुपमध्ये प्रथम दोन स्थानावर असलेल्या संघ सुपर-4 साठी पात्र ठरले. सुपर-4 स्टेजमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध एक-एकदा खेळेल. नंतर पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये असलेल्या टीम्समधील सामना 28 सप्टेंबरला फायनलसाठी खेळला जाईल.

Comments are closed.