Asia Cup: टीम इंडियाची फायनलमध्ये धडक! सूर्या आणि कंपनीने बांग्लादेशला 41 धावांनी लोळवले
बुधवारी आशिया कपच्या सुपर फोर सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा 41 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, अभिषेक शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात, बांगलादेश 19.3 षटकांत सर्व गडी गमावून 127 धावा करू शकला. बांगलादेशकडून सैफ हसनने सर्वाधिक 69 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतल्या. या विजयासह, भारतीय संघ आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, ज्यात त्यांचा सामना पाकिस्तान किंवा बांगलादेशशी होईल.
169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बांगलादेशला दुसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. तन्झिद हसन तीन चेंडूत फक्त एक धाव करू शकला. इमॉनने 19 चेंडूत 21 धावा केल्या. तौहिद 10 चेंडूत सात धावा काढून बाद झाला. शमीम हुसेनला खाते उघडता आले नाही, त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले. कर्णधार झाकीर अली 5 चेंडूत फक्त 4 धावा काढू शकला. सूर्यकुमार यादवने त्याला धावबाद केला. सैफने 51 चेंडूत 69 धावांची खेळी केली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
Sunation रविवारी भारत एशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात पात्र आहे. 🚨
– इतर फायनलिस्टचा निर्णय उद्या होईल. pic.twitter.com/wq3bpwlzqu
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 24 सप्टेंबर, 2025
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 168 धावा केल्या. बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात मंद होती, परंतु दोन्ही फलंदाजांनी पॉवरप्ले 3 षटकानंतर गियर बदलले आणि वेगाने धावा केल्या. शुबमन गिल 29 धावा काढून बाद झाला. तर शिवम दुबे फक्त दोन धावा काढू शकला. सलामीवीर अभिषेक शर्माने 37 चेंडूत 75 धावांचे योगदान दिले. शेवटी तो धावबाद झाला. सूर्यकुमार यादव 11 चेंडूत फक्त 5 धावा काढून बाद झाला. शेवटी हार्दिक पांड्याच्या 38 धावांच्या जोरावर भारताने 168 धावसंख्येचे लक्ष्या दिले. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने दोन तर मुस्तफिजूर रहमान, तन्झिम हसन सकीब आणि मोहम्मद सैफुद्दीन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Comments are closed.