पाकिस्तानचा माजी दिग्गज अन् सूर्यकुमार यादवचं हस्तांदोलन; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर काय


पाकिस्तानी स्पिन मुश्ताक अहमद सह सूर्यकुमार यादव हँडशेक्स : आशिया कप 2025 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत चाहत्यांच्या अपेक्षांनुसार चांगली कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजमधील सर्व सामने सहज जिंकत टीम इंडिया सुपर-4 मध्ये दाखल झाली आणि येथेही आपली विजयी मालिका कायम ठेवली. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर 24 सप्टेंबर रोजी बांगलादेशवर 41 धावांनी मात करत भारताने एक सामना शिल्लक असतानाच अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.

पाकिस्तानचा माजी दिग्गज अन् सूर्यकुमार यादवचं हस्तांदोलन

याचदरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत तो पाकिस्तानचा माजी फिरकीपटू मुश्ताक अहमद याच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. या फोटोकडे विशेष लक्ष वेधले जात आहे कारण यंदाच्या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलनावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पहिल्या सामन्यात टॉसदरम्यान सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडू थेट मैदानाबाहेर गेले, तर पाकिस्तानी खेळाडू हस्तांदोलनासाठी मैदानावरच उभे राहिले होते.

या घटनेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामनाधिकारी अँडी पाइक्रॉफ्ट यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, आयसीसीने सर्व आरोप फेटाळून लावत पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली. एवढेच नव्हे, भारताने पाकिस्तानविरुद्धचा पहिला विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना अर्पण केला होता. पण आता सूर्यकुमार यादवचा मुश्ताक अहमद यांच्यासोबतचा हस्तांदोलनाचा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे.

सुपर-4 मध्ये भारत-पाकिस्तान खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक

आशिया कप सुपर-4 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने आले. मात्र, यावेळी सामन्यात क्रिकेटसोबतच दोन्ही संघांमध्ये शब्दयुद्ध देखील रंगले. पहिल्या पराभवाचा विसर न पडलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी सामन्यादरम्यान अपशब्दांचा वापर सुरू केला. हारिस रऊफने भारतीय फलंदाजांना उचकवण्याचा खूप प्रयत्न केला. पण टीम इंडियाचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी त्याला योग्य तो प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सामना खेळापेक्षा मैदानावरील शाब्दिक चकमकीमुळे अधिक रंगला.

हे ही वाचा –

Ind vs Pak Asia Cup 2025 : मोठी बातमी! मैदानात नको नको ते केलं, अखेर बीसीसीआयने अ‍ॅक्शन घेतलीच, पाकिस्तान अडचणीत, हारिस अन् साहिबजादावर होणार कारवाई?

आणखी वाचा

Comments are closed.