हिंदुस्थान-नेपाळ आज भिडणार
गटफेरीत अपराजित राहिलेल्या हिंदुस्थानी फुटबॉल संघाची खरी परीक्षा गुरुवारी रेसकोर्स आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. 17 वर्षांखालील सॅफ करंडक फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हिंदुस्थानी संघापुढे नेपाळचे आव्हान असेल.
हिंदुस्थानी संघ स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक प्रभावी संघ ठरलाय. मालदीववर 6-0 असा दणदणीत विजय, भूतानवर 1-0 अशी मात आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 3-2 असा रोमांचक विजय मिळवत हिंदुस्थाने ‘ब’ गटातून सर्वाधिक 9 गुणांसह अव्वल स्थान पटकावले.
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस विशेषतः आनंदी होते. ते म्हणाले, ‘पाकिस्तानवर विजय मिळवणे आमच्यासाठी महत्त्वाचे ठरले. इतक्या निर्णायक सामन्यात खेळाडूंनी दबाव कसा झेलला याचा मला अभिमान आहे. मुलांनी जिद्द व शिस्त दाखवली. या कामगिरीमुळे उपांत्य सामन्यांपूर्वी आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे.’
दुसरीकडे नेपाळने ‘अ’ गटातून यजमान श्रीलंकेवर 2-0 असा विजय मिळवला, पण बांगलादेशविरुद्ध 0-4 असा पराभव पत्करला. त्यामुळे या संघाला गटफेरीत दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. फर्नांडिस मात्र नेपाळच्या क्षमतेबाबत सावध आहेत. ते म्हणाले, ‘ते कठीण प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यांच्याकडे चांगली वैयक्तिक प्रतिभा असलेले अनेक खेळाडू आहेत. मला वाटते हा अत्यंत चुरशीचा सामना होईल. आमचे लक्ष उत्तम तयारी, संघटित खेळ आणि आपल्या क्षमतेनुसार खेळण्यावर आहे.’
आता बाद फेरीच्या टप्प्यात आपल्या खेळाडूंना संयम राखण्याची व आखलेल्या योजनेवर टिकून राहण्याची गरज असल्याचे फर्नांडिस यांनी अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, ‘मुलांना या टप्प्याचे महत्त्व समजले आहे. शांत राहून, एकत्र मेहनत घेऊन आणि मैदानावर शंभर टक्के योगदान देणे गरजेचे आहे. आम्ही हीच लय कायम ठेवत आपले ध्येय साध्य करण्याकडे एक पाऊल पुढे टाकू इच्छितो.’
किरण जॉर्जने सिंगापूरच्या माजी जागतिक विजेत्या लोह कीन यूला चांगली टक्कर दिली, मात्र शेवटी हिंदुस्थानी खेळाडूला 14-21, 22-20, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीत अनुपमा उपाध्याय हिला चौथ्या मानांकित व जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या पुत्री वर्दानीकडून 16-21, 15-21 अशा सरळ गेममध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. मिश्र दुहेरीत मोहित जगलान आणि लक्षिता जगलान या हिंदुस्थानी जोडीला जपानच्या युइची शिमोगामी आणि सयाका होबारा या जोडीने 7-21, 14-21 असे पराभूत केले.
Comments are closed.