टीम इंडिया आशिया चषकाच्या फायनलमध्ये पोहोचली; पण एक चिंता कायम; एक चूक अन्…
एशिया चषक अंतिम 2025 संघ भारत: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) काल भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 41 धावांनी बांगलादेशचा पराभव केला. तसेच या विजयासह भारताने (Team India Final Asia Cup 2025) आशिय चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सुपर-4 टप्प्यात भारताचा अजून एक सामना बाकी आहे, जो 26 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताच्या संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती देण्याची शक्यता आहे.
आशिया चषकाच्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत पाच सामने खेळले. या पाचही सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. मात्र अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर भारताला एका गोष्टीची चिंता कायम आहे, ती म्हणजे क्षेत्ररक्षणाची…खराब क्षेत्ररक्षणामुळे भारतावर आशिया चषक (Asia Cup Final 2025) गमावण्याची वेळ येऊ शकते. आशिया चषकाच्या या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केलेली नाहीय. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातच भारतीय खेळाडूंनी पाच झेल सोडले. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 च्या सामन्यातही (Ind vs Pak) असेच चित्र दिसून आले. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत सर्वाधिक 12 झेल सोडले आहेत. अंतिम फेरीत यात सुधारणा करावी लागेल, अन्यथा जेतेपद जिंकण्याची संधी हातातून निसटू शकते.
Sunation रविवारी भारत एशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात पात्र आहे. 🚨
– इतर फायनलिस्टचा निर्णय उद्या होईल. pic.twitter.com/wq3bpwlzqu
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 24 सप्टेंबर, 2025
भारत आणि बांगलादेशचा सामना कसा राहिला? (Ind vs Ban Match Highlight)
नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, अभिषेक शर्मा याने तुफानी फलंदाजी करत फक्त 37 चेंडूत 75 धावा ठोकल्या. त्याला हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 38 धावांची साथ दिली आणि भारताने 6 गडी गमावत 168 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. प्रत्युत्तर, जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच बांगलादेशला धक्का दिला आणि नंतर कुलदीप यादव व वरुण चक्रवर्ती यांच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून बांगलादेशाची संपूर्ण टीम 127 धावांत गुंडाळली. भारताने 41 धावांनी मोठा विजय मिळवला.
टीम इंडियाच्या विजायानंतर पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ (Asia Cup 2025 Super 4 Points Table Update)
भारताच्या या विजयामुळे सुपर-4 मध्ये टीम इंडियाने दोन सामन्यांत दोन विजय मिळवत 4 गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आणि फायनलमध्ये जागा पक्की केली. पाकिस्तान आधीप्रमाणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा प्रवास यानंतर संपला आहे आणि ते आता फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. गुरुवारी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना अक्षरशः उपांत्य फेरीसारखा ठरणार आहे. कारण, जो जिंकेल त्याला फायनलमध्ये संधी मिळेल, तर हरलेल्याचा आशिया कपमधील प्रवास संपेल.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.