सुधारणार नाहीच! हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता मोहसीन नक्वीने केलं घाणेरडं कृत्य, भार
पाकिस्तान मोहस नकवी: आशिया कप 2025 च्या सुपर-4 च्या भारतविरुद्धच्या (Ind vs Pak match Asia Cup 2025 ) सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या. मैदानात नको नको ते हावभाव करत भारतीय संघ आणि चाहत्यांना चिथावण्याचा प्रयत्न केला. साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर गोळीबाराची अॅक्शन करत सेलिब्रेशन केले. तर हारिस रौफने क्षेत्ररक्षण करताना विमान खाली पाडण्याचा इशारा करत होता. या कृतींमुळे भारतीय खेळाडू आणि चाहत्यांचा संताप अनावर झाला, कारण अशा वागणुकीमुळे मैदानातील वातावरण तापले.
हा वाद ओसरायच्या आतच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi Controversy Asia Cup 2025) यांनी आणखी वाद पेटवला. त्यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो विमान पाडल्याचा इशारा करताना दिसतो. अशा संवेदनशील काळात असे व्हिडीओ शेअर करणे, म्हणजे भारताला जाणीवपूर्वक उकसवण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. जबाबदार पदावर असूनही नक्वी यांनी वातावरण शांत करण्याऐवजी आणखी पेटवले.
हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानचा संताप (India skipped the customary handshakes with Pakistan’s players)
भारत–पाकिस्तानच्या पहिल्या सामन्यात (14 सप्टेंबर) टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. यावरून पाकिस्तानने थेट आयसीसीकडे तक्रार केली आणि सामना रेफरी अँडी पायकॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर UAE विरुद्धचा पाकिस्तानचा सामना तब्बल तासभर उशिरा सुरू झाला आणि वाद आणखी पेटला.
जर आयसीसीला काही लाज शिल्लक असेल तर त्यांनी पाकिस्तान क्रिकेटवर 2 वर्षांवर बंदी घालावी.
एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी हे चित्र हेतुपुरस्सर ठेवून भारताची उघडपणे चेष्टा केली, हे अस्वीकार्य आहे
– स्पेस रेकॉर्डर (@1 स्पेसरकॉर्डर) 24 सप्टेंबर, 2025
भारतीय संघाने पाकिस्तानच्या या सर्व चाळ्यांना उत्तर थेट खेळातून दिले. सुपर-4 मध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करून त्यांचा गर्व मोडला. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी तुफानी फलंदाजी करत मैदानातच पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून वारंवार उकसवण्याचे प्रकार घडले तरी भारताने खेळाची शुद्ध भावना जपली आणि प्रतिस्पर्ध्याला करारी धडा शिकवला.
भारत–पाकिस्तान अंतिम फेरीत भिडणार?
सुपर-4 मधील दुसऱ्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 41 धावांनी पराभव करून आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना बांगलादेश किंवा पाकिस्तान यांच्याशी होणार आहे. 25 सप्टेंबरला पाकिस्तान–बांगलादेश यांच्यातील सामना ‘करो या मरो’ प्रकारचा असेल. त्या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळणार आहे. यामुळे आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसऱ्यांदा आमनेसामना होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कधीही भारत–पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळलेले नाहीत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.