कामाख्या मंदिर गुवाहाटी: कामाख्या मंदिर, गुवाहाटी

आसामच्या गुवाहाटीमध्ये वसलेले कामाख्या देवीचे मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक प्रसिद्ध शक्तीपीठ आहे. भगवान विष्णूने देवी सतीच्या मृत शरीराचे ५१ तुकडे केले तेव्हा देवीचा योनी भाग या ठिकाणी पडला. त्यामुळे कामाख्या मंदिरात देवीची मूर्ती नसून देवीच्या योनीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार येथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे देवी रजस्वला होते आणि या काळात मंदिर बंद ठेवले जाते. कामाख्या देवी ही तांत्रिकांची मुख्य देवी आहे. त्यामुळे वर्षभर इथे साधू-अघोरींची वर्दळ असते.

देवी प्रत्येक वर्षी होते रजस्वला
या ठिकाणी देवीचा योनी भाग पडला होता. यामुळे देवी येथे प्रत्येक वर्षी तीन दिवसांसाठी रजस्वला होते. या काळात मंदिर बंद असते. तीन दिवसांनतर मंदिर पुन्हा उघडले जाते. मात्र या 3 दिवसांच्या काळात मंदिर बंद करण्यापूर्वी देवीच्या गाभाऱ्यात पांढरे वस्त्र ठेवले जाते. 3 दिवसांनंतर मंदिर उघडल्यावर हे पांढरे वस्त्र लाल झालेले असते. या कापडाला ‘अम्बुवाची’ कापड म्हणतात.

प्रसाद म्हणून देतात अम्बुवाची कापड
अम्बुवाची कापड हे इथे भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. हे कापड घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. अनेक जण तासनतास रांगेत उभे राहून हे कापड प्रसाद म्हणून घेत असतात.

नदीही होते लाल
त्या तीन दिवसांच्या काळात कामाख्या मंदिराजवळून जाणारी ब्रह्मपुत्रा नदी देखील लाल होते. तसेच मंदिराच्या चार गाभाऱ्यांपैकी ‘गर्वर्गिहा’ हे सती मातेचे गर्भ असल्याचे म्हंटले जाते.

वर्षातील मोठी जत्रा
दरवर्षी कामाख्याला मोठी जत्रा भरते, ज्याला ‘अंबुवाची’ जत्रा म्हणतात. ही जत्रा जूनमध्ये म्हणजेच जेव्हा तीन दिवस देवी रजस्वला होते त्या काळात भरते. या काळात कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मग चौथ्या दिवशी मोठा उत्सव साजरा करून धुमधडाक्यात मंदिर पुन्हा खुले केले जाते.

Comments are closed.