व्वा, रे ‘देवा’चे राज्य! मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून शेतकऱ्याला दारुडा ठरवलं; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यात पुराने थैमान उडवून दिला आहे. पावसामुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला गेला आहे. अस्मानी संकटापुढे शेतकरी हतबल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांना मदत आणि कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या एका शेतकऱ्याला प्रशासनाने थेट दारूडा थरवले. यावरून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला चढवला.
अंबादास दानवे यांनी गुरुवारी सकाळी एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. यात मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या एका शेतकऱ्याला पोलीस ओढून घेऊन जातात. यावेळी तिथे उपस्थित माध्यम प्रतिनिधी त्या शेतकऱ्याची संवाध साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पोलीस शेतकऱ्याला थेट दारूडा ठरवतात.
मुख्यमंत्री उजनी येथे संवाद साधत असताना शेतकऱ्याने त्यांना मदतीबाबत प्रश्न विचारला. तसेच तुम्ही किती मदत करणार. आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकट करतात म्हणतात, पण किती करणार? नुकसान लाखोचे झाले आणि हे 7 ते 8 हजार देणार. त्याबाबत हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी राजकारण करू नका म्हटले. पण मी राजकारणी नाही, मी शेतकरी आहे, असे संबंधित शेतकरी माध्यम प्रतिनिधी बोलताना म्हणाला.
हाच व्हिडीओ शेअर करत अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला चढवला. तुम्ही शेतकरी म्हणून प्रश्न विचारा..सरकार तुम्हाला लगेच दारुडा ठरवेल..व्वा, रे ‘देवा’चे राज्य! कोणत्या अँगलने हा शेतकरी दारू पिलेला वाटला पोलिसांना? असा सवाल दानवे यांनी केला. तसेच अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
तुम्ही शेतकरी म्हणून प्रश्न विचारा..
सरकार तुम्हाला लगेच दारुडा ठरवेल..व्वा, रे ‘देवा’चे राज्य!
कोणत्या अँगलने हा शेतकरी दारू पिलेला वाटला पोलिसांना? #marathwadallood pic.twitter.com/ch4bmsrnze
– अंबाविस डेव्ह (@आयम्बोएपडेव्ह) 25 सप्टेंबर, 2025
शेतकरी बांधवांनो, हे आहेत अगोदरचे विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री. हे 2020 साली विरोधीपक्ष नेता म्हणून जे जे बोलले आहेत, ते सगळं-सगळं ते आत्ता करणार आहेत, अगदी कागदावर! बोलची कढी आणि बोलाचा भात ते थेट बँक अकाउंटला पाठवणार आहेत, असे ट्विट दानवे यांनी केले.
शेतकरी बांधवांनो, हे आहेत अगोदरचे विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री..
हे २०२० साली विरोधीपक्ष नेता म्हणून जे जे बोलले आहेत, ते सगळं-सगळं ते आत्ता करणार आहेत, अगदी कागदावर! बोलची कढी आणि बोलाचा भात ते थेट बँक अकाउंटला पाठवणार आहेत. @Dev_fadnavis #marathwadallood pic.twitter.com/dngtzrexz1
– अंबाविस डेव्ह (@आयम्बोएपडेव्ह) 25 सप्टेंबर, 2025
Comments are closed.