या तीन घटना म्हणजे माझ्याविरोधात रचलेला मोठा कट; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात. टॅरिफ आणि H1B व्हिसामुळे ते चर्चेत आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला त्यांनी संबोधित करत महासभा त्यांच्या क्षमतांचा पूर्ण वापर करत नसून ते त्यांची क्षमता वाया घालवत असल्याची टीका केली. तसेच महासंघाच्या मुख्यालयात त्यांच्यासोबत तीन घटना घडल्या, या तीन घटना म्हणजे आपल्याविरोधातील मोठा कट असून सीक्रेट सर्विसद्वारे या घटनांचा तपास करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात एस्केलेटरवर पाऊल ठेवल्यानंतर लगेचच एस्केलेटर अचानक बंद पडला. त्यामुळे ट्रम्प यांनी कार्यालयाच्या दूरवस्था आणि दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच त्यांच्या भाषणावेळी टेलिप्रॉम्परही बंद पडला. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडून आपल्याला बंद पडलेला एक्सलेटर आणि बंद असलेला टेलिप्रॉम्पर मिळाला, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच त्यांच्या भाषणावेळी माइकमध्येही तांत्रिक बिघाड असल्याने त्यांचा आवाज ऐकण्यात अनेकांना अडचणी आल्या. या तीन घटना म्हणजे आपल्याविरोधातील मोठा कट असून सीक्रेट सर्विसद्वारे या घटनांचा तपास करण्यात येईल, असे सांगितले.

ट्रम्प यांच्या पुढे असलेल्या एका व्यक्तीकडून एक्सलेटर बंद करण्यात आल्याची शक्यता संयुक्त महासंघाच्या प्रवक्त्याने दिली आहे. तसेच टेलिप्रॉम्पटरची व्यवस्था व्हाईट हाऊसकडे असल्याने त्याच्याशी आपला संबंध नसल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र, या तीन घटनांचा संदर्भ दंत ट्रम्प यांनी आपल्याविरोधात मोठा कट असल्याचे म्हटले आहे.

Comments are closed.