बनारसी आणि सिल्क साड्या घरच्या घरी या पद्धतीने करा ड्रायक्लीन
साडी महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. विविध प्रकारच्या साड्या महिलांकडे असतात. विशेष करून बनारसी, सिल्क.. या साड्या सोहळे, समारंभासाठी परफेक्ट असतात. त्यामुळे या साड्या महिलांकडे असतातच. सोहळ्या-समारंभावरून आल्यानंतर मात्र या साड्यांचा मेंटेनन्स ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. कारण कार्यक्रमात साड्यांवर अन्नपदार्थांचे, मेकअपचे डाग पडतात. अशा वेळी साड्या ड्रायक्लीनिंगसाठी देण्यात येतात. वाढती महागाईची झळ जशी इतर गोष्टींना लागली आहे तशी साडी ड्रायक्लीनिंगला सुद्धा आहे. त्यामुळे आज आपण घरच्या घरी बनारसी आणि सिल्क साड्या कशा पद्धतीने ड्रायक्लिन करता येतील ते पाहूयात,
सोपी पद्धत –
- एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात 1 चमचा खायचा सोडा आणि 1 चमचा मीठ घाला.
- तुम्ही यात सौम्य शॅम्पू सुद्धा मिक्स करू शकता.
- सर्व मिश्रण एकजीव करुन घ्यावे.
- या पाण्यात साडी 10 मिनिटासांठी भिजत ठेवावी.
हे ही वाचा – कुर्त्याचा लूक बदलणाऱ्या क्लासी आणि स्टायलिश पँट्स, आजच करा खरेदी
- साडी स्वच्छ करण्यासाठी चुकूनही ब्रश वापरू नका.
- जेव्हा तुम्ही या मिश्रणात साडी भिजत घालाल तेव्हा साडीवरचे सर्व डाग निघून जातील.
- साडी स्वच्छ पाण्यातून 2 ते 3 वेळा धुवून काढा.
- सिल्कची साडी असेल तर थोडा वेळ निथळत ठेवा आणि हलक्या प्रकाशात वाळवत ठेवा.
- या ट्रिकमुळे साडीचा मळ आणि दुर्गंध निघून जाण्यास मदत होईल आणि साडी जशी लाँड्रीमध्ये ड्रायक्लीन करून
- मिळते तशी स्वच्छ झालेली दिसेल.
डाग काढा मीठाने –
साडीवर पडलेले डाग काढण्यासाठी मीठाचा वापर करता येईल. डाग पडलेल्या भागावर थोडे मीठ घाला आणि मऊसूत कापडाने डाग घासून घ्यावेत. या ट्रिकमुळे डाग निघून जाण्यास मदत होईल.
ड्राईक्लिन –
तुम्हाला घरच्या घरी महागड्या साड्या ड्रायक्लीन करायच्या असतील तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे ड्राय क्लीनिंग किट खरेदी करणे. ड्राय क्लीनिंग किट खरेदी केल्याने तुम्हाला घरातून तुमच्या महागड्या साड्या केव्हाही ड्रायक्लीन करता येतील.
हे ही वाचा – Fashion Tips : या रंगाचे ब्लाउज तुमच्याकडे हवेच, सर्व साड्यांवर होतील मॅचिंग
Comments are closed.