क्रिकेटने संधी दिली, पण वाया घालावली, करुण नायर अखेर बाहेर, कारकीर्दच संपली?
बीसीसीआयने वेस्ट इंडीज कसोटी मालिकेसाठी इंडिया पथकाची घोषणा केली: आशिया कपनंतर भारत आणि वेस्ट इंडिज (Team India vs West Indies) यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मधील भारताची पहिली घरच्या मैदानावरील मालिका आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी दुबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. ही मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत पहिली कसोटी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार असून दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा करुण नायर याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आले आहे.
करुण नायरला संघातून बाहेरचा रस्ता (Karun Nair Dropped Team India)
तब्बल आठ वर्षांनंतर करुण नायरला टेस्ट संघात पुनरागमनाची संधी मिळाली होती, मात्र ती तो साधू शकला नाही. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेत करुण नायरला वारंवार संधी देण्यात आली, पण तो अपयशी ठरला. या मालिकेत करुण नायरने 4 सामन्यांच्या 8 डावांत एकूण 207 धावा केल्या. फक्त एकदाच त्याने अर्धशतक झळकावलं होतं. त्याचा सरासरी फक्त 25.63 एवढा राहिला. त्यामुळे आता भारतीय कसोटी संघातून करुण नायरची कारकीर्द संपली, अशा चर्चा रंगल्या आहेत.
करुण नायरने आत्तापर्यंत भारताकडून 10 टेस्ट सामने खेळले असून त्यात त्याने 41.35 च्या सरासरीने 579 धावा केल्या आहेत. यात त्याची नाबाद 303 धावांची ऐतिहासिक खेळी आहे. मागील रणजी हंगामात त्याने 9 सामन्यांत 863 धावा केल्या होत्या. त्या कामगिरीमुळेच तब्बल आठ वर्षांनी त्याची टेस्ट संघात पुनरागमन झालं होतं. वयाच्या 30 पलीकडे गेलेल्या नायरला संघ व्यवस्थापनाने दीर्घकालीन पर्याय म्हणून क्रमांक तीनवर पाहणं कठीण असल्याने त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलला संघात स्थान मिळले आहे.
🚨 सादर करणे #Teamindiaवेस्ट इंडीज चाचणी मालिकेसाठी पथक 🔽#Indvwi | @Idfcfirstbank pic.twitter.com/s4d5mdgjnn
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 25 सप्टेंबर, 2025
देवदत्त पडिक्कलचा जबरदस्त फॉर्म
देवदत्त पडिक्कलने अलीकडच्या काळात अप्रतिम कामगिरी केली आहे. दुलीप ट्रॉफीत त्याने तीन सामन्यांत 111.5 च्या सरासरीने 223 धावा केल्या आहेत. त्याच्या दमदार फॉर्मकडे पाहून संघ व्यवस्थापन त्याला कसोटी संघात पुनरागमनाची संधी दिली आहे. करुण नायरच्या अपयशामुळे पडिक्कलला मोठी संधी मिळाली.
वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ (India Squad For West Indies Tests series)
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (WK), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.
भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा कसोटी संघ (वेस्ट इंडीज पथक भारत कसोटी मालिकेच्या विरोधात))
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, अल्झारी जोसेफ, शेमार जोसेफ, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.