करुण नायरला टीममधून का काढलं? अजीत अगरकर यांनी केला खुलासा
टीम इंडिया ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, त्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर शुबमन गिल पुन्हा एकदा टीम इंडियाची कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. तसेच रवींद्र जडेजा याला या मालिकेसाठी उपकर्णधार बनविण्यात आले आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात करुण नायरला संधी देण्यात आलेली नाही, तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 8 वर्षांनंतर करुणची टीम इंडियात पुनरागमन झाले होते.
करुण नायरला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंड दौरा त्याच्यासाठी काही खास ठरला नव्हता. आता वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये करुण नायरच्या जागी देवदत्त पडिक्कलचा समावेश करण्यात आला आहे. यावर टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजीत अगरकर म्हणाले, “आम्हाला करुण नायरकडून अजून अपेक्षा होत्या, फक्त एका डावावर नाही. पडिक्कल अधिक संधी मिळवून देऊ शकतो. आम्हाला प्रत्येकाला 15-20 संधी द्यायच्या आहेत, पण या परिस्थितीत ते शक्य नाही.”
श्रेयस अय्यरबद्दल बोलताना अजीत अगरकर म्हणाले, “श्रेयस अय्यर एक वरिष्ठ खेळाडू आहे, तो इंडिया ए चे कर्णधार देखील राहिला आहे. आम्ही अनेक खेळाडूंमध्ये नेतृत्वाचे गुण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. दुर्दैवाने श्रेयस त्यांच्या फिटनेसच्या कारणामुळे उपलब्ध राहणार नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला हवे आहे की ते खेळावेत आणि उत्तम खेळ करावा.”
Comments are closed.