7 फलंदाज, 4 अष्टपैलू, 4 गोलंदाज; वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा धडाकेबाज कसोटी संघ, पाहा संपूर्ण या
वेस्ट इंडीजविरूद्ध इंडिया कसोटी पथक चाचणी मालिका: वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची (Team India Squad Against West Indies Test Series) आज (25 सप्टेंबर) घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिलच्या (Shubhman Gill) नेतृत्वाखालील संघात देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शनसह नितीशकुमार रेड्डी, एन. जगदीसनला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार आहे.
वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात 7 फलंदाज, 4 अष्टपैलू खेळाडू आणि 4 गोलंदाजांचा समावेश केला आहे. फलंदाजांमध्ये शुभमन गिल (Shubhman Gill), यशस्वी जैस्वाल (Jaiswal), केएल राहुल (KL Rahul), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, एन. जगदीसन यांचा समावेश आहे. तर अष्टपैलूध्ये रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी यांचा समावेश आहे. तसेच गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे.
रवींद्र जडेजा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार- (Ravindra Jadeja VC Of India)
भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. करुण नायरलाही संघातून वगळण्यात आले आहे. रवींद्र जडेजाला भारतीय संघाचा नवा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ (Team India for series against West Indies):
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, एन. जगदीसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.
🚨 सादर करणे #Teamindiaवेस्ट इंडीज चाचणी मालिकेसाठी पथक 🔽#Indvwi | @Idfcfirstbank pic.twitter.com/s4d5mdgjnn
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 25 सप्टेंबर, 2025
वेस्ट इंडिजचा कसोटी संघ- (West Indies Full Squad)
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, अल्झारी जोसेफ, शेमार जोसेफ, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स
भारत-वेस्ट इंडिज मालिकेचे वेळापत्रक- (Ind vs WI Schedule)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिली कसोटी 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तर दुसरी कसोटी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाईल.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.