Navdurga : देवीच्या नऊ रुपांकडून महिलांनी काय शिकावे ?
उदे गं अंबे उदे असं म्हणत दुर्गेचे, आदीशक्तीचे जगभरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. नवरात्रीचा सण हा दैवी स्त्री शक्तीचा उत्सव आहे. या नऊ दिवसात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यात शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्ययन, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री या रुपांची समावेश आहे. देवीचे प्रत्येक रुप हे वेगळे असून देवीच्या या रुपाकडून स्त्रीने शिकण्यासारखे, घेण्यासारखे बरेच आहे. ही नऊ रुपे स्त्रीची ताकद, अस्तित्ववाविषयी बरंच काही सांगतात. खरंतर स्त्री मध्ये प्रचंड शक्ती असते. तिने एखादी गोष्ट ठरवल्यास नक्कीच पूर्ण करू शकते, इतकी ताकद तिच्यात असते, गरज असते ती तीने स्वत:ला ओळखण्याची.
शैलपुटरी –
शैलपुत्री.. शैल म्हणजे पर्वत अर्थात हिमालयाची कन्या. या हिमालयाच्या कन्येकडून आपण आत्मविश्वास वाढवणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आपल्या जीवनाचा खरा उद्देश शोधणे या गोष्टी शिकू शकतो. हिमालय उंचावर असल्याने महिलांनी तिच्याकडून ध्येय गाठण्याची प्रेरणा घ्यावी. कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याची जिद्ध घ्यावी.
ब्रह्मचारीनी –
ब्रह्मचारिणी.. देवी ब्रह्मचारिणीकडून ज्ञान, तप, वैराग्य, त्याग, संयम, धैर्य आणि कठोर परिश्रमातून यश मिळवण्याचे सामर्थ्य शिकावे. त्यांनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे स्त्रियांनी तिच्यात जग बदलण्याची ताकद आहे, हे ओळखावे.
चंद्रघंत –
चंद्रघंटा.. देवी चंद्रघंटा शौर्य, शक्ती आणि वाईट शक्तींचा नाश करण्याचे प्रतिक आहे. चंद्र हा शांत, शितल ग्रह आहे आणि तो बुद्धीमत्तेशी संबंधित आहे. त्यामुळे चंद्रघंटेकडून स्त्रियांनी शांत राहण्याचा गुण अंगिकारावा, मनावर नियंत्रण ठेवण्यास शिकावे.
कुशमंडा –
कुष्मांडा.. ‘कु’ म्हणजे थोडे, ‘उष्मा’ म्हणजे उष्णता किंवा ऊर्जा आणि ‘अंड’ म्हणजे ब्रह्मांड, यावरून तिच्या नावाचा अर्थ होतो की तिच्या मंद हास्यातून विश्वाची उत्पत्ती झाली. महिलांनी तिच्याकडून स्वत: चे अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा घ्यावी.
स्कंदमाता –
स्कंदमाता.. स्कंद देवीच्या रुप हे आपल्या मुलाला मांडीवर घेऊन सिंहासनावर बसलेली आहे. स्त्रियांनी ती वास्तल्याची मूर्ती ओळखावी.
कटययानी –
अन्यायाविरुद्ध लढणारी अशी कात्यायनी.. महिलांनी कात्यायनीकडून अन्याय सहन न करता त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला शिकले पाहिजे. केवळ स्वत:वरच नाही तर आजूबाजूला घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवे.
टाइमरियात
काल म्हणजे वेळ. स्त्रियांनी कालरात्रीसारखे असावे.. कधीतरी शांत राहावे आणि मनाला विश्रांती द्यावी. स्त्री घर, कुटूंब , नोकरी या सर्वांकडे ती लक्ष देतेच. त्यामुळे कालरात्रीकडून स्त्रियांनी मनाला आणि शरीराला विश्रांती देण्यास शिकावे.
महागौरी –
महागौरी .. देवीचे हे रुप आपल्याला संयम ठेवण्यास शिकवते, कारण निसर्गाच्या खेळात कोणतीही गोष्ट क्षणात घडत नाही. त्यामुळे महिलांनी योग्य वेळेची वाट पाहणे महागौरीकडून शिकायला हवे. महागौरी ही ज्ञान, मोक्ष यांचा संदेश देणारी आहे. खरं तर, स्त्रियांमध्ये हे गुण जन्मत:च असतात. गरज असते ती तिला या गुणांची जाणीव होण्याची…
सिद्धिदात्र –
सिद्धी’ म्हणजे अलौकिक शक्ती किंवा ध्यान करण्याची क्षमता. देवी या शक्तींचा दाता आहे. जग जिकण्याची ताकद आहे, तिने स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवे.
खरंतर, महिलांवरील वाढते अत्याचार पाहता महिलांनी स्वत: मधील दुर्गा, रणचंडी, काली, भवानी, जगदंबेला जागे करून स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वत: ची लढाई लढण्यासाठी स्वत: मध्ये दडलेल्या देवीच्या या नऊ रुपांना जागे करणे ही काळाची गरज झाली आहे. नवरात्र उत्सवाचा अर्थ धार्मिक महत्त्वापलीकडे सांस्कृतिकदृष्ट्या खोलवर आहे, विशेषतः महिलांसाठी, हे प्रत्येकाने आत्मसात करायला हवे.
हे ही वाचा – Navratri 2025 : यंदाचा नवरात्र उत्सव 10 दिवसांचा, या तिथीची वाढ झाल्याने आनंदात वाढ
Comments are closed.