लैंगिक छळ केल्याचा आरोप शैक्षणिक संस्था संचालक

विद्यार्थ्यांकडून तक्रार दाखल झाल्यानंतर शोध सुरू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचे माजी प्रमुख स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर 17 विद्यार्थ्यांनी लैंगिक छळाचे आरोप केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या विद्यार्थिनी ईडब्ल्यूएस शिष्यवृत्ती अंतर्गत संस्थेत पीजीडीएम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट) कार्यक्रम घेत होत्या. चैतन्यनंद यांच्यावर अश्लील टिप्पणी केल्याचा, अश्लील संदेश पाठवण्याचा आणि जबरदस्तीने त्यांना स्पर्श केल्याचा आरोप आहे.

चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी यांच्याविरुद्ध वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यावेळी ते संस्थेचे प्रमुख होते. मात्र, गंभीर आरोपांनंतर त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले होते. एफआयआर दाखल झाल्यापासून चैतन्यनंद फरार आहेत. पोलिसांनी त्यांना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे शोधून काढत त्यांची चौकशी सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी शारदा इन्स्टिट्यूटच्या तळघरातून चैतन्यनंद यांची व्होल्वो कार जप्त केली. पोलिसांनी भादंविच्या कलम 75(2)/79/351(2) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. स्वामी चैतन्यनंद बनावट राजनैतिक नंबरप्लेट असलेली कार वापरत असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी कार जप्त केली आहे.

दिल्लीस्थित शारदा संस्था ही कर्नाटकातील शृंगेरी येथील दक्षिणमनोय श्री शारदा पीठाची शाखा आहे. पीठाने या प्रकरणावर एक निवेदन जारी केले असून त्यामध्ये स्वामी चैतन्यनंद यांचे वर्तन आणि क्रियाकलाप बेकायदेशीर आणि पीठाच्या हिताच्या विरुद्ध असल्याचे सांगतानाच पीठाचा त्यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

Comments are closed.