हिंदुस्थानला आणखी एक झटका; डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधांवर लावला 100 टक्के टॅरिफ, 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेत जगभरातील फार्मा सेक्टरमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प प्रशासनाने विदेशातून आयात होणाऱ्या ब्रँडेड औषधांवर आणि पेटंटेड प्रोडक्टवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून याची अंमलबजावणी सुरू होईल. याचा सर्वाधिक फटका हिंदुस्थानला बसण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेला सर्वाधिक औषधे हिंदुस्थान निर्यात करतो.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने याआधी हिंदुस्थानमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावला होता. 27 ऑगस्ट 2025 पासून हा टॅरिफ लागू झाला आहे. यामुळे कपडे, खड्यांचे दागिने, फर्निचर, मासळी उद्योग संकटात आले आहेत. अर्थात त्यावेळी ट्रम्प प्रशासनाने फार्मा सेक्टरला टॅरिफ लावलेला नव्हता, मात्र आता यावर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.