पाकिस्तानचा स्टार सैम अयूबची लाजिरवाणी कामगिरी; 6 डावांत चौथ्यांदा शून्यावर बाद
यंदाच्या आशिया कपमध्ये पाकिस्तानचा स्टार फलंदाज सैम अयुब अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो सलग तिसऱ्या डावात ऑफ स्पिनर मेहेदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अयुबने एक लाजिरवाणा विक्रम रचला आहे. आशिया कप टी-20 च्या सुपर फोर टप्प्यातील ‘करो या मरो’ सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 11 धावांनी सामना जिंकला.
आशिया कप 2025 मध्ये सहा डावांमध्ये चौथ्यांदा सैम अयुब शून्यावर बाद झाला. आशिया कप 2025च्या पहिल्या दोन सामन्यात तो आपले खाते उघडू शकला नाही. तो ओमान, भारत आणि युएई विरुद्ध शून्यावर बाद झाला. पुढच्या सामन्यात त्याला भारताविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले, जिथे त्याने 21 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्धही त्याने दोन धावा केल्या. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही तो कामगिरी करू शकला नाही.
अयुब हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच मालिकेत किंवा स्पर्धेत चार वेळा शून्यावर बाद होणारा पूर्ण सदस्य देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी 2009च्या टी-20 विश्वचषकात आंद्रे फ्लेचर तीन वेळा शून्यावर बाद झाला होता.
रविवारी पाकिस्तानने बांगलादेशचा 10 धावांनी पराभव करून आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना स्पर्धेत तिसऱ्यांदा भारताशी होईल. आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आमनेसामने येतील.
Comments are closed.