वाल्मिकीने थेट पोलिसांच्याच कॉलरला हात घातला, म्हणाला, ‘500 रुपये घेतोस, तू चोर बिकाऊ…’,
कल्याण: कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला (Kalyan Crime News) केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. कल्याणच्या कोर्टात 8 आरोपींना हजर केल्यानंतर, त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये(Kalyan Crime News) घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.(Kalyan Crime News)
Four Accused Attack Police: पाठीमागे बसण्यास सांगितल्यानं रागाच्या भरात हल्ला
ही घटना कल्याण न्यायालयाच्या परिसरात घडली आहे, कल्याणच्या कोर्टात 8 आरोपींना हजर केल्यानंतर, त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. या कैद्यांना न्यायालयातून पुन्हा जेलमध्ये नेण्यासाठी पोलीसांनी गाडी बोलावली होती, पण गाडीत जागा कमी असल्यामुळे पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना पाठीमागे जाऊन बसा असे सांगितले. समोर आलेल्या माहितीप्रमाणे पाठीमागे बसण्यास सांगितल्यानं रागाच्या भरात चार आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे. आकाश वाल्मीकी, गणेश उर्फ शालु मरोठीया, योगींदर उर्फ भोलु धरमवीर मरोठीया, विवेक शंकर यादव, असे या प्रकरणातील आरोपींची नावं असून, त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करत शिविगाळ केली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
Four Accused Attack Police: आकाश वाल्मीकी नावाच्या आरोपीची पोलिसांना शिवीगाळ
या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले असून यातील आकाश वाल्मीकी नावाचा आरोपी पोलिसांवर आरेरावी करत तु हात कसा उचलला असा प्रश्न विचारताना दिसतो आहे, तर इतर काहीजण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी तो एका पोलिसाला शिवीगाळ करतो, तर तू भिकारी आहेस पाचशे रूपये तू घेतो, चोर बिकाऊ म्हणत त्या पोलिस अधिकाऱ्याला शिव्या देतो. यावेळी पोलिस अधिकारी देखील त्या वाल्मिक नावाच्या आरोपीला शिवीगाळ करतो.
Four Accused Attack Police: आरोपींना पोलिसांचा धका उरला की नाही?
आरोपी पोलिसांसमोरच एका पोलिस कर्मचाऱ्याला खालच्या भाषेत बोलत आणि लाच घेतो असं म्हणत शिवीगाळ करताना दिसतो. त्या व्हिडीओमध्ये इतर पोलिस आणि कर्मचारी बसमध्ये शांतपणे बसल्याचे दिसतात, तर आकाश वाल्मीकी नावाचा आरोपी पोलिसांवर आरेरावी करत तु हात कसा उचलला असा प्रश्न विचारताना दिसतो, तर तो एका पोलिस कर्मचाऱ्याला शिव्या देत तू पाचशे रूपये घेतो चोर बिकाऊ म्हणत शिवीगाळ करतो, या घटनेनंतर त्या ठिकाणी नेमकं काय घडलं याच्या चर्चा रंगल्या आहेत, मात्र पोलिसांचा धाक उरला आहे की नाही अशा चर्चा रंगल्या आहेत.
कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे, कल्याण न्यायालयाच्या परिसरातच चार कौद्यांकडून पोलीसावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.#क्रिमहेन्यूज #kaynanws #Police pic.twitter.com/dxq9nnhc2x
– अंकीता शांतीनाथ खाने (@khaneankita) 26 सप्टेंबर, 2025
आणखी वाचा
Comments are closed.