पंजाबी दादी हरजीत कौर यांना अमेरिकेतून केलं हद्दपार, शीख संघटनांचा संताप

अमेरिकेत राहणारे शीख ट्रम्प सरकारवर प्रचंड संतापले आहेत. या संतापाचे कारण म्हणजे अमेरिकेने तीन दशकांहून अधिक काळ देशात राहणाऱ्या वृद्ध हरजीत कौर यांना हिंदुस्थानात परत पाठवले आहे. हिंदुस्थानी समुदायाने ही कृती अत्यंत क्रूर आणि अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. ७३ वर्षीय हरजीत कौर २३ सप्टेंबरला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्या.
33 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य, हिंदूस्थानी वंशाच्या महिलेची तुरूंगात रवानगी, वाचा नेमकं काय घडलं?
हरजित कौर यांचे वकील दीपक अहलुवालिया यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये हे शेअर केले. अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स डिपार्टमेंट (ICE) ने रविवारी रात्री अचानक हरजीत कौर यांना बेकर्सफील्डहून लॉस एंजेलिसला नेले आणि तिला चार्टर्ड फ्लाइटने नवी दिल्लीला पाठवले. अहलुवालिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, या प्रवासादरम्यान हरजीत कौर यांना अत्यंत अमानुष वागणूक देण्यात आली. त्यांना बेड्या घालून, लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. तसेच हिंदुस्थानात त्यांना परत पाठवताना, कुटूंबाचा निरोप घेण्याची परवानगीही देण्यात आली नाही.
हरजीत कौर यांच्या कुटुंबीयांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना काही तासांसाठी कुटुंबाला भेटण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. परंतु त्यांची विनंती अमान्य करण्यात आली. कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या संख्येने लोक या हद्दपारीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
हरजीत कौर या १९९२ मध्ये अमेरिकेला गेल्या. तिथे त्यांनी साडीच्या दुकानात शिवणकाम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी या दरम्यान करही भरला होता. परंतु २००५ मध्ये त्यांच्यासाठी हद्दपारीचा आदेश जारी करण्यात आला होता. त्यांनी त्यानंतर आयसीई प्रोटोकॉलचे पालन केले आणि वर्क परमिटचे नूतनीकरण केले. हरजीत कौरचा कुठलाही गुन्हेगारी रेकाॅर्ड नव्हता.
Comments are closed.