विवेक गुप्ता आयएनएस चेअरमन म्हणून नियुक्त

तरुण भारत समूह प्रमुख, सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांची कार्यकारी समितीत फेरनिवड

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

इंडियन न्यूजपेपर सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षपदी वर्ष 2025-2026 साठी ‘सन्मार्ग’ वृत्तसंस्थेचे प्रमुख विवेक गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेची 86 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली आहे. या सभेत अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकारी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावच्या दै. तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांची या संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. विवेक गुप्ता हे मावळते अध्यक्ष एम. व्ही. श्रेयांसकुमार यांचे स्थान घेत आहेत. उपाध्यक्ष म्हणून लोकमत या वृत्तसंस्थेचे किरण राजेंद्र दर्डा यांची निवड करण्यात आली असून ‘अमर उजाला’चे तन्मय माहेश्वरी यांचीही उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर ‘गृहशोभिका’चे अनंत नाथ यांची संस्थेचे मानद खजिनदार म्हणून निवड झाली आहे. मेरी पॉल या संस्थेच्या सचिवपदी आहेत.

अनेक मान्यवरांचा कार्यकारी समितीत समावेश

थंथी वृत्तसंथेचे एस. बालसुब्रम्हणियम, भास्कर वृत्तसंस्थेचे गिरीश अग्रवाल, प्रगतीवादीचे समाहित बाल, हिंदुस्थान टाईम्सचे समुद्र भट्टाचार्य, बाँबे समाचारचे होरमुसजी कामा, फिल्मी दुनियाचे गौरव चोप्रा, पंजाब केसरीचे विजय कुमार चोप्रा, लोकमतचे विजय जवाहर दर्डा, दै. चरहदीकलाचे जगजीतसिंग दरडी, नवहिंद टाईम्सच्या पल्लवी एस. धेंपो, इंडियन एक्स्पे्रसचे विवेक गोयंका, दै. जागरणचे महेंद्र मोहन गुप्ता, दै. जागरणचे संजय गुप्ता, मिड डेचे शैलेश गुप्ता, बिझनेस स्टँडर्डचे शिवेंद्र गुप्ता, मराठी चे योगेश जाधव, न्यू इंडिया हेरॉल्डचे राजेश जैन, अजित वृत्तसंस्थेचे सर्विंदर कुमार, दैनिक हिंदुस्थानचे विलास ए. मराठे, आनंदबाझार पत्रिकाचे ध्रूव मुखर्जी, बलभूमीचे पी. व्ही. नंदीश, सकाळचे प्रताप पवार, द सेंटिनलचे राहुल राजखेवा, दिनकरनचे एम. आर. रमेश, टेलिग्राफचे अतिदेब सरकार, गुजरात समाचारचे अमन एस. शहा, मयुराच्या सौभाग्यलक्षी तिलक, एनाडूचे आय. वेंकट, व्यापार-जन्मभूमीचे कुंदन व्यास, वेस्टर्न टाईम्सचे किरण वडोदारिया, राष्ट्रदूत साप्ताहिकचे सोमेश शर्मा, मल्याळ मनोरमाचे जयंत मॅथ्यू, हेल्थ अँड अँटेसेप्टिकचे एल. आदीमूलम, इकॉनॉमिक टाईम्सचे मोहीत जैन, साक्षीचे के. पी. आर. रेड्डी, आज समाजचे राकेश शर्मा तसेच मातृभूमीचे एम. व्ही. श्रेयांसकुमार आदी मान्यवरांची निवड संस्थेच्या कार्यकारी समितीवर झाली आहे.

Comments are closed.