अटकेच्या भीतीने नेत्यानाहू यांच्या विमानाच्या मार्ग बदलला; युरोपचा हवाई मार्ग टाळला

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी न्यू यॉर्कला जाताना युरोपच्या हवाई मार्गाने प्रवास टाळला आहे. नेत्यानाहू यांना युरोपच्या काही देशात कथित युद्ध गुन्ह्यांसाठी अटक होऊ शकते, या भीतीने त्यांनी युरोपचा हवाई मार्ग टाळत लांबच्या मार्गाने प्रवास केला आहे. अटकेच्या भीतीमुळे नेत्यानाहू यांना काही देशांच्या हवाई हद्दीतून प्रवास करता येत नाही.

नेत्यानाहू त्यांच्या जेट ‘विंग्स ऑफ झिओन’ गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला जात असताना त्यांनी हवाई मार्ग बदलला आहे. त्यांचे जेट युरोपियन हवाई क्षेत्रावरून जाणारा मार्ग दाखवत होते. मात्र, नोव्हेंबर 2024 मध्ये नेतान्याहू आणि त्यांचे माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्यावर गाझामध्ये युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांचा आरोप करणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या अटक वॉरंटमुळे असणारा धोका यामुळे टाळण्यात आला. युरोपमधील अनेक आयसीसी सदस्य राष्ट्रांनी वॉरंट अंतर्गत जाहीर कले आहे आहे की, जर नेत्यानाहू त्यांच्या हद्दीत आले तर त्यांना अटक करण्यात येईल.

या मार्गाऐवजी नेतन्याहू यांचे विमान ग्रीस आणि इटलीच्या सीमेवरून गेले, भूमध्य समुद्र ओलांडला आणि नंतर जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून अटलांटिक महासागरावरून पुढे गेले. अमेरिकेला जाणारी इस्रायली विमाने मध्य युरोपमधून जलद आणि थेट मार्गाने जातात, ज्यामध्ये फ्रेंच हवाई क्षेत्राचा समावेश आहे. मात्र, नेत्यानाहू यांच्या प्रवासासाठी हा मार्ग टाळण्यात आला. त्यामुळे त्यांचे सुमारे ३७३ मैल (६०० किमी) अंतर वाढले. नेतान्याहू शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर पुढील आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेटीसाठी वॉशिंग्टनला जाणार आहेत.

Comments are closed.