सोशल मीडियावर होणार धुमाकूळ! Meta नं आणलं नवं प्लॅटफॉर्म Vibes; चुटकीसरशी बनवता येणार AI व्हिडी
मेटा व्हाइब्स: सोशल मीडियावर (Social Media) आता धुमाकूळ होणार आहे. कारण मेटाने ‘Vibes’ नावाचा एक नवा AI व्हिडीओ फीड सुरू केला आहे, ज्यामध्ये वापरकर्ते AI व्हिडीओ तयार करू शकतील आणि रीमिक्सही करू शकतील. सोशल मीडियामध्ये एक नवीन श्रेणी निर्माण करण्यासाठी मेटाने हे मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे अनेक प्लॅटफॉर्मच्या अडचणीत वाढ होऊ शकते, जे सध्या कंटेंटसाठी पूर्णतः युजर्सवर अवलंबून आहेत. मेटाने या नव्या फीडद्वारे AI-जनरेटेड कंटेंटवर मोठा डाव खेळला आहे.
कसे वापरायचे Vibes? (how to use Vibes)
Vibes ला Meta AI अॅप आणि मेटाच्या वेबसाइटद्वारे वापरता येईल. हे एक प्रकारचे AI चॅटबॉट आहे, जे क्रिएटिव हब म्हणून कार्य करेल. उदाहरणार्थ, सध्या तुम्ही सोशल मीडियावर इतर लोकांनी तयार केलेले व्हिडीओ पाहता. पण Vibes प्लॅटफॉर्मवर, माणसाने दिलेल्या प्रॉम्प्टवरून AI तयार केलेले व्हिडीओज दिसतील. जर तुम्हाला एखादा व्हिडीओ आवडला, तर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला तो रीमिक्स करण्याचा पर्याय देतो. त्यामध्ये तुम्ही नवीन म्युझिक घालू शकता, व्हिज्युअल्स बदलू शकता, किंवा स्वतःच्या पसंतीनुसार नवीन प्रॉम्प्ट देऊन एक संपूर्ण नवीन व्हिडीओ तयार करू शकता.
मेटाने व्हायबस लॉन्च केले
टिकटॉकला नव्या पद्धतीने टक्कर देताना, मेटाने सोशल मीडियाच्या एका नव्या श्रेणीमध्येही आपली आघाडी मिळवली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीच एलन मस्क यांनी सांगितले होते की, बंद पडलेली Vine अॅप पुन्हा सुरू केली जाऊ शकते, ज्यामध्ये AI जनरेट केलेले व्हिडीओज दाखवले जातील. पण मस्क यांची ही योजना प्रत्यक्षात येण्याआधीच मेटाने आपला नवा प्लॅटफॉर्म ‘Vibes’ लाँच करून आघाडी घेतली आहे. हा प्लॅटफॉर्म अशा प्रकारे डिझाईन करण्यात आला आहे की, तो मेटाच्या इकोसिस्टममध्ये सहज समाविष्ट होतो. म्हणजेच, Vibes वर तयार केलेले व्हिडीओ सहजपणे Instagram आणि Facebook च्या स्टोरीज किंवा रील्समध्ये शेअर करता येतील. यामुळे Vibes ला वापरकर्त्यांकडून मोठी पसंत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.