Health Tips: शिंक आल्यावर खरंच जीव जाऊ शकतो का? जाणून घ्या कारण
अनेकदा आपल्याला सर्दी- ताप झाल्यास सतत शिंका येतात. यामुळे आपण वैतागून जातो. पण शिंका केवळ सर्दी- ताप झाल्यावरच नव्हे तर सामान्य परिस्थितीतही येतात. म्हणजेच आपल्या नाकात काही विषारी किंवा धुळीचे कण गेले तर ते शिंकेच्या माध्यमातून ते बाहेर पडतात. पण अनेकदा तुम्ही ऐकले किंवा वाचले असेल की शिंक आल्यावर हृदय काही सेकंदांसाठी बंद पडते. मग खरंच शिंक आल्यावर मृत्यूचा धोका असतो का? असा प्रश्न पडतो. नेमके यामागचे सत्य काय ते जाणून घेऊया…
नाक हे हवा शरीरात घेते आणि ती फुफ्फुसांपर्यंत पोहोचवते. हे कार्य करताना आपले नाक विषारी आणि धुळीचे कण फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखते. जेव्हा असे कण नाकात अडकतात तेव्हा शिंकेच्या माध्यमातून ते बाहेर फेकले जातात. याच परिस्थितीत शिंक येते. याला स्टर्न्युटेशन असेही म्हणतात.
शिंकताना हृदय बंद पडते का?
शिंक आल्यावर हृदय पूर्णपणे बंद पडत नाही तर हृदयाचे ठोके तात्पुरते मंदावतात. यामुळे मृत्यूचा धोका नसतो. शिंकल्यानंतर एक-दोन सेकंदांनी हृदय पुन्हा आपले कार्य करते. त्यामुळे शिंकताना हृदय बंद पडते आणि यामुळे मृत्यूचा धोका निर्माण होतो हे चुकीचे आहे.
शिंक रोखून ठेवणे धोकादायक
जेव्हा जेव्हा तुम्हाला शिंक येते तेव्हा ती रोखणे घातक ठरू शकते. काही प्रकरणांमध्ये, असे केल्यास माणूस बेशुद्ध होतो किंवा फुफ्फुसांना नुकसान पोहोचते असे आढळले आहे. शिंकताना हवा ताशी १५० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने बाहेर पडते अशा वेळी ती रोखल्याने मेंदूतील रक्तस्त्राव, श्वासनलिका संबंधित समस्या होऊ शकतात.
Comments are closed.