आशिया कपच्या फायनलपूर्वी दिग्गज गोलंदाज पाकिस्तानच्या मदतीला, भारताला हरवण्याचा फॉर्म्युला दिला
दुबई: आशिया चषकाच्या फायनलमध्ये (Asia Cup Final 2025) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) आमने सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने अंतिम फेरीत लढणार असल्यानं या महामुकाबल्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भारतानं आशिया चषकात आतापर्यंत सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. भारताचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करतोय. तर, पाकिस्तानचं नेतृत्त्व सलमान आगा करतोय. भारत आणि पाकिस्तान यंदाच्या आशिया चषकात दोन वेळा आमने सामने आले होते. भारतानं पाकिस्तानला त्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं. फायनलपूर्वी पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम यानं भारताविरुद्ध टीमनं काय करायला पाहिजे याचा सल्ला दिला आहे.
Wasim Akram Tips to Pakistan : वसीम अक्रमच्या पाकिस्तानला टिप्स
आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज आणि माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम यानं मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्ताननं भारताची फलंदाजी सुरु असताना लवकर विकेट घेतल्या पाहिजेत. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलची लवकर घेतल्यास भारताला बॅकफूटवर पाठवता येऊ शकतं. फायनल मॅच रोमांचक होईल, अशी अपेक्षा आहे. बेस्ट टीम जिंकेल, अशी आशा असल्याचं वसीम अक्रम यानं म्हटलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या रविवारी फायनल होणार आहे. त्या मॅचसाठी भारताला अधिक पसंती नक्कीच आहे.तुम्ही किंवा क्रिकेट प्रेमींनी पाहिलं आहे, मी पाहिलं आहे. या फॉरमॅटमध्ये काहीही घडू शकते. एक चांगली खेळी, एक चांगला स्पेल या फॉरमॅटमध्ये सामन्याचा निकाल बदलू शकतो. पाकिस्ताननं रविवारी आत्मविश्वासानं खेळावं, मुमेंटमचा फायदा घ्यावा,सेन्सिबल क्रिकेट खेळावं. पाकिस्ताननं सुरुवातीला विकेट घेतल्या तर ते भारताला बॅकफूटवर ढकलू शकतात, असं वसीम अक्रम यानं म्हटलं.
भारत पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने सामने
आशिया चषक 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं होतं. भारत आणि पाकिस्तान 14 सप्टेंंबरला ग्रुप स्टेजमधील मॅचमध्ये आमने सामने आले होते. भारतानं त्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान 21 सप्टेंबरला आमने सामने आले. त्यामध्ये देखील भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.
आशिया चषकाच्या फायलनमध्ये पहिल्यांदा आमने सामने
भारत आणि पाकिस्तान आशिया चषकाच्या 41 वर्षाच्या इतिहासात अंतिम सामन्यात पहिल्यांदा आमने सामने येणार आहेत. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनातील सूर्यकुमार यादवच्या टीम पुढं आता अंतिम फेरीत पाकिस्तानचं आव्हान असेल.
व्हिडिओ | एशिया कप २०२25: पाकिस्तानच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानची भूमिका साकारत असताना, दिग्गज पाकिस्तान क्रिकेटपटू वसीम अक्रम म्हणतात, “अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तानचा खेळ आहे, भारत नक्कीच पसंती आहे, पण काहीही घडू शकते. पाकिस्तानने आत्मविश्वास वाढवावा, गती, स्वत: ला परत आणले पाहिजे,… pic.twitter.com/v4qdxnd8bb
– प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@pti_news) 25 सप्टेंबर, 2025
आणखी वाचा
Comments are closed.