प्लास्टिक चॉपिंग बोर्ड वापरताय? फर्टिलिटी आणि हार्मोनल हेल्थचे होईल नुकसान
आपल्या दैनंदिन आयुष्यातील तांब्या-पितळ, स्टील, अल्युमिनियम या धातूंची जागा आता प्लास्टिकने घेतली आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असो वा फळे, भाज्या या इतर अन्नपदार्थ खरेदी करताना वापरली जाणारे प्लास्टिक असो… अशा छोट्या छोट्या गोष्टी रॅपिंग करताना देखील प्लास्टिकचा वापर केला जातो. किचनमध्ये सर्वात जास्त प्लास्टिकचा वापर होतो. प्लास्टिकचे डब्बे, प्लेट्स असो वा चॉपिंग बोर्ड. प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड स्वस्त मिळत असल्याने सर्रासपणे वापरले जातात. पण, तुम्हाला हे माहिती आहे का की प्लास्टिकचा फर्टिलिटी आणि हार्मोनल हेल्थवर नकारात्मक परिणाम होत आहे.
बीपीए आणि फॅथेलेट्ससारखी हानिकारक केमिकल्स –
काही प्लास्टिकमध्ये बीपीए (बिस्फेनॉल ए) आणि फॅथेलेट्स सारखी हानिकारक केमिकल्स असतात. ही केमिकल्स थेट हार्मोन्सवर परिणाम करू शकतात. शरीरात या केमिकल्सचे प्रमाण हळूहळू वाढल्यास चयापचयाचा वेग मंदावू शकतो.
हे ही वाचा – Health Tips: शिंक आल्यावर खरंच जीव जाऊ शकतो का? जाणून घ्या कारण
फर्टिलिटवर होतो परिणाम –
प्लास्टिकमध्ये हार्मोन्सवर नकारात्मक परिणाम करणारी केमिकल्स असतात. हे केमिकल्स महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित समस्या वाढवू शकतात. यामुळे PCOS ची समस्या उद्भवू शकते.
मायक्रोप्लास्टिकमुळे एकूण आरोग्यावर परिणाम –
- जेव्हा आपण प्लास्टिक बोर्डवर भाज्या, फळे कापता तेव्हा मायक्रोप्लास्टिक पदार्थात मिसळतात. दररोज काही प्रमाणात हे कण शरीरात गेल्याने जमा होऊन पोटाचे आरोग्य बिघडवू शकतात.
- पोटाचे आरोग्य बिघडल्याने आतड्यांमध्ये जळजळ होऊ शकते आणि चांगल्या आतड्यांवरील बॅक्टेरियावर परिणाम होऊ शकतो.
- हार्ट अटॅकचा झटका, स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
- प्लास्टिकमधील केमिकल्समुळे कॅन्सरचा धोका वाढतो. विशेष करून ब्रेस्ट कॅन्सर.
हे ही वाचा – प्रेग्नेसीमध्ये ही औषधी घेणे टाळा, आईसह बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
Comments are closed.