वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेपूर्वी KL राहुल अन् साई सुदर्शन तळपला, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना धू


दुसर्‍या अनधिकृत कसोटीत भारताने ऑस्ट्रेलिया ए बीट ए: इकाना स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघांदरम्यान कसोटी सामना खेळवला गेला. भारतीय संघाला 2 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध (India vs West Indies Test) कसोटी मालिका खेळायची आहे. त्या मालिकेसाठी निवड झालेल्या अनेक खेळाडूंनी या सामन्यातही खेळत आहे. त्यात सलामीवीर के. एल. राहुल आणि साई सुदर्शनचाही समावेश आहे. दोन्ही फलंदाजांनी शानदार शतके झळकावली आणि टीम इंडियाचा विजय निश्चित केला. भारताने हा सामना 5 विकेट्सने जिंकला मालिका 1-0 अशी जिंकली. ऑस्ट्रेलिया अ संघाने या सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी 412 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने खेळाच्या चौथ्या दिवशी कोणत्याही अडचणीशिवाय साध्य केले.

के. एल. राहुलचे शानदार शतक (Kl Rahul Century India A Beat Australia A)

सामन्याच्या चौथ्या दिवशी के. एल. राहुलने अप्रतिम शतक ठोकले. त्याने केवळ 136 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीमुळे भारत अ संघ विजयाच्या जवळ पोहोचत आहे. आजारी असूनही राहुलने हार मानली नाही आणि मैदानात उतरून दमदार खेळ केला. तिसऱ्या दिवशी राहुल 74 धावांवर खेळत असताना रिटायर्ड हर्ट झाला होता. त्याला दुखापत नाही तर ताप आला होता. दरम्यान, निवडकर्त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी के. एल. राहुलचा भारतीय संघात समावेश केला आहे.

170 चेंडूत साई सुदर्शनचे शतक (Sai Sudarshan Century India A Beat Australia A)

चौथ्या दिवसाच्या दुपारनंतर साई सुदर्शनने आपले शतक पूर्ण केले. त्याने 170 चेंडूंमध्ये शंभर धावा पूर्ण केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. 23 वर्षीय साई सुदर्शनचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आठवे शतक होते. याशिवाय त्याच्या नावावर सात अर्धशतकेही आहेत. साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. शतक झळकावल्यानंतर लगेचच तो बाद झाला. त्याने 172 चेंडूंमध्ये 100 धावांची खेळी केली.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवले, 5 विकेट्सने जिंकला सामना

या सामन्यात, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 420 धावा केल्या. भारताचा डाव फक्त 194 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियन संघाने याचा पुरेपूर फायदा घेतला आणि भारतासमोर विजयासाठी 412 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने हे लक्ष्य तुलनेने सहजतेने गाठले. भारताने हा सामना 5 विकेट्सने जिंकला.

हे ही वाचा –

IND vs PAK Final: पाकिस्तानचा संघ कसाबसा फायनलमध्ये पोहोचताच गौतम गंभीरचं तीन शब्दांचं ट्विट, म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.