पाच हजारांच्या एसआयपीनं सुरुवात केल्यास 5 कोटींचा फंड किती वर्षात तयार होईल? एक फॉर्म्युला ठरेल गेमचेंजर

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी सिस्टमेटिक इन्वेस्टिक प्लॅन म्हणजेच एसआयपी सुरु करता येते. एसआयपी ही गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. नव्यानं नोकरी लागल्यानंतर लवकर गुंतवणूक सुरु केल्यास दीर्घकाळाचा विचार केल्यास मोठा फंड तयार करता येईल. 5000 रुपयांच्या एसआयपीनं सुरुवात केल्यास योग्य नियोजनाद्वारे मोठा फंड तयार करता येईल.

5000 रुपयांची एसआयपी सुरुवातीला छोटी वाटत असली तरी स्टेप-अपच्या नियमाचा वापर करुन दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवता येईल. 5000  हजार रुपयांच्या एसआयपीनं सुरुवात केल्यानंतर दरवर्षी 10 टक्के स्टेपअप सुरु ठेवल्यास आणि 12 टक्के वार्षिक सीएजीआर अपेक्षित ठेवल्यास 31 वर्षात 5 कोटींचा फंड तयार होऊ शकतो.

एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. फंड मॅनेजर्स ती रक्कम शेअर, बाँड किंवा इतर ठिकाणी गुंतवतात. लाँग टर्मचा विचार केल्यास 12 टक्के सीएजीआरनं परतावा अपेक्षित असतो. स्टेपअप एसआयपी म्हणजे  दरवर्षी ज्या प्रमाणं पगार वाढतो त्या प्रमाणं एसआयपीची रक्कम 10 टक्क्यांनी वाढवणे. एसआयपी सुरु  करताना 5000 ,एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्षी 5500  आणि  दुसरं वर्ष सुरु झाल्यानंतर 6000 रुपयांची  एसआयपी दरमहा सुरु ठेवणं होय.

जर स्टेप अपशिवाय दरमहा 5000 रुपयांची एसआयपी सुरु ठेवल्यास लाँगटर्ममध्ये जबरदस्त रिटर्न मिळू शकतात.  5 कोटींचा फंड तयार करायचा असल्यास 12  टक्के सीएजीआरनं आणि 5000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 42 वर्ष लागू शकतात. 42 वर्षांच्या कालावधीत गुंतवणूक 30 लाख 24 हजार रुपये होईल. तर त्याच्यावर 4.69 कोटींचा परतावा मिळून 5.02 कोटींचा फंड तयार होईल. यासाठी मात्र गुंतवणुकीची सुरुवात खूप लवकर करावी लागेल.

एसआयपी सुरु केल्यानंतर दरवर्षी 10 स्टेप अप केल्यास 5 कोटींचा फंड तयार करण्यासाठी 31 वर्ष लागतील. या काळात तुमची गुंतवणूक 1.08 कोटी रुपये असेल. तर तुम्हाला मिळणारा परतावा 12 टक्के सीएजीआरनुसार 5.05 कोटी रुपये असेल.

स्टेपअप एसआयपीचे अनेक फायदे आहेत. दरवर्षी मोठी मोठी रक्कम गुंतवली गेल्यानं लवकर मोठा फंड तयार होतो. जसा पगार वाढतो त्या प्रमाणं एसआयपीच्या रकमेत वाढ केल्यास कमी कालावधीत मोठा फंड तयार करु शकता. काही फंडमध्ये गुंतवणूक केल्यानं करात सूट देखील मिळते.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

येथे प्रकाशितः 26 सप्टेंबर 2025 03:56 पंतप्रधान (आयएसटी)

Comments are closed.