शिवसेनेची शेतकऱ्याला थेट मदत, कळसाने कुटुंबाला दिली 51 हजाराची रोख रक्कम

अतिवृष्टीने बीड जिल्ह्यातील पिंपळवाडी येथील नदीच्या पुरात दहा वर्षाचा आदित्य वाहून गेला. त्याच्या मृत्यूने शेतकर्‍याचं कुटुंब दु:खाच्या डोहात बुडाले. या कुटुंबाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी 51 हजाराची रोख मदत सन्मानाने देत त्यांना धीर दिला.

बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील नदीला आलेल्या महापुरात उत्तम कळसाने यांचा दहा वर्षाचा आदित्य कळसाने हा मुलगा मृत्युमुखी पडला. आदित्यच्या मृत्युने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली गेली. कळसाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. या घटनेची माहिती जिल्हा संपर्कनेते अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार आज माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी 51 हजार रूपयाचा धनादेश कळसाने कुटुंबाला देत त्यांना धीर दिला. यावेळी माजी सरपंच अर्जुन बहिरवाळ, उद्धव कळसाने, अंकुश नहिराळे, दामोधर सोळंके उपस्थित होते.

Comments are closed.