टीम इंडियाची घोषणा होताच वेस्ट इंडिज बोर्डाने घेतला मोठा निर्णय! शमार जोसेफ संघाबाहेर, नवख्या ख


भारत विरुद्ध वेस्ट इंडीज चाचणी मालिका: आशिया कपनंतर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने गुरुवारी भारतीय संघाची घोषणा केली असून वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आधीच आपला संघ जाहीर केला होता. मालिकेला सुरूवात होण्यास आता एक आठवड्यापेक्षाही कमी वेळ आहे. मात्र त्याआधीच वेस्ट इंडीजला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज शमार जोसेफ दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. याबाबतची माहिती वेस्ट इंडीज क्रिकेटने सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली असून त्याच्या जागी पर्यायी खेळाडूचीही घोषणा केली आहे.

शमार जोसेफ दुखापतीमुळे बाहेर (Shamar Joseph ruled out of India test series)

वेस्ट इंडीज बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “शमार जोसेफ दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला असून बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी त्याची पुन्हा फिटनेस चाचणी घेतली जाईल.” 26 वर्षीय जोसेफने गेल्या वर्षी कसोटीत पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने केलेल्या तुफानी गोलंदाजीमुळे तो जगभरात चर्चेत आला. भारताविरुद्धही तो वेस्ट इंडीजसाठी एक प्रमुख गोलंदाज ठरला असता, पण आता त्याचे बाहेर होणे विंडीजसाठी मोठा झटका आहे.

शमार जोसेफचा पर्याय, जोहान लेने कोण आहे? (Who is Johann Layne?)

जोहान लेने याला अजून वेस्ट इंडीजकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळालेली नाही. 22 वर्षीय हा ऑलराउंडर आतापर्यंत 19 फर्स्ट क्लास सामने खेळला असून 32 डावांत 495 धावा केल्या आहेत तसेच 66 विकेट घेतले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याचा गोलंदाजी सरासरी अवघी 19.03 इतकी आहे. त्याने चार वेळा पाच बळींची कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताविरुद्ध त्याला कसोटीत पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा अपडेट कसोटी संघ (West Indies Squad For India Tests series) : रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, अल्झारी जोसेफ, जोहान लेने, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स

वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ (India Squad For West Indies Tests series) : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (WK), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.

हे ही वाचा –

Ind vs Pak Final 2025 : नको ते कृत्य करून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी घेतलं धोनी अन् कोहलीचं नाव, ICCच्या सुनावणीत नेमकं घडलं काय?

आणखी वाचा

Comments are closed.