Health Tips: फिट अँड फाईन राहण्यासाठी आहारात समाविष्ट करा ‘या’ भाज्या
फिट अँड फाईन राहण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. बरेच जण रोजच्या आहारात भाज्या खात नाहीत. मात्र तज्ञांच्या मते, काही भाज्यांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. या भाज्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि पचनक्रिया सुधारते. या भाज्या कोणत्या ते जाणून घेऊया….
ब्रोकोली
ब्रोकोली शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते. यामध्ये सल्फोराफेन असते ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
बीटरुट
बीटरुटमध्ये नायट्रेट्स असतात जे रक्तप्रवाह सुधारतात आणि त्यातील बीटेन हा घटक पचनक्रिया सुधारण्यास फायदेशीर ठरते.
रताळे
उपवासाला आपण रताळे खातो. पण रताळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे ते उपवासाव्यतिरिक्त पण खाणे चांगले असते. रताळ्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
पालक आणि हिरव्या पालेभाज्या
पालक आणि इतर हिरव्या भाज्यांमध्ये मॅग्नेशियम, फोलेट आणि प्रीबायोटिक फायबर भरपूर प्रमाणात असते, जे निरोगी आतड्यांसाठी फायदेशीर असते.
गाजर
गाजर हे बहुतांश वेळा सॅलड म्हणून खाल्ले जाते. यामध्ये कॅरोटीनॉइड्स असतात, जे त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर असतात.
कार्ले
कारल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यात पोषक घटक असतात चयापचय सुधारते.
फुलकोबी
फुलकोबी मेंदू आणि यकृताच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. ही कमी कॅलरीज असलेली भाजी आहे.
Comments are closed.