आशिया कप 2025 च्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात भारतीय संघात 2 बदल, बुमराहसह हा खेळाडू बाहेर

Team India Playing 11 : टीम इंडिया आज आशिया कप 2025चा शेवटचा सुपर 4 सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ आधीच अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे, त्यामुळे हा सामना सराव सामना असेल. भारतीय संघाने या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. दरम्यान, श्रीलंकेच्या संघाचा हा स्पर्धेतील शेवटचा सामना आहे, कारण दोन सामने गमावल्यानंतर संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने एक बदल केला आहे, तर भारतीय संघाने दोन बदल केले आहेत.

नाणेफेक जिंकणाऱ्या श्रीलंकेने चमिका करुणारत्नेच्या जागी जानिथ लियानागेची निवड केली आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू शिवम दुबे यांना भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. कर्णधाराच्या मते, या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे कारण भारतीय संघ 28 सप्टेंबर रोजी आशिया कप 2025च्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना करणार आहे. बुमराहच्या जागी अर्शदीप सिंग आणि शिवम दुबेच्या जागी हर्षित राणा यांची निवड करण्यात आली आहे. परिणामी, भारतीय संघात आता फलंदाजीची पूर्वीसारखी खोली राहणार नाही.

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.

श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, चारिथ असलंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, जेनिथ लियानागे, दुष्मंथा चमीरा, महेश थिक्षणा आणि नुवान थुषारा.

Comments are closed.