Asia Cup 2025 – पाकिस्तानचा कांगावा अन् ICC ची सूर्यकुमार यादवर कारवाई; BCCI ने दिलं आव्हान

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवर ICC ने कारवाई केली आहे. त्याला सामना शुल्काच्या 30 टक्के इतका दंड ठोठावला आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने टीम इंडियाचा विजय पहलगाम हल्ल्यातील पीडितांना समर्पित केला होता. सूर्यकुमारच हे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा कांगावा करत पाकिस्तानने ICC कडे तक्रार केली होती. ICC च्या या कारवाईला BCCI नेही आव्हान दिलं आहे.
साखळी फेरीतील सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव करत सामना जिंकला होता. सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने हा विजय पहलगाम हल्ल्यातील पीडितांना समर्पित असल्याचं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावर पाकिस्तानने आक्षेप घेतला, तसेच टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंबर हस्तांदोलन करण्याचे सुद्धा टाळले होते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे तक्रार केली होती. मात्र, हस्तांदोलन केलचं पाहिजे असा कोणताही नियम ICC च्या नियमावलीमध्ये नसल्याच सांगत ICC ने पाकिस्तानला फटकारलं. मात्र, सूर्यकुमार यादवने केलेलं वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हणत त्याच्यावर कारवाईची मागणी केली. सूर्यकुमारने सर्व आरोप फेटाळून लावले, परंतु ICC ने त्याच्यावर सामना शुल्काच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे. त्याला BCCI ने आव्हान दिलं आहे.
Comments are closed.