पगारवाढ न होताच पगार 1 लाखांनी वाढला, डॉलर- रुपयाच्या खेळात मोठा उलटफेर, काय घडलं?
नवी दिल्ली : भारताचं चलन रुपया गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. 26 डिसेंबर 2025 ला अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत आज रुपया 6 पैशांनी मजबूत झाला. यासह भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 88.70 रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे. गुरुवारी भारताचा रुपया अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत 7 पैशांनी वाढला होता मात्र नंतर तो कमजोर झाला. H-1B व्हिसाच्या फीरमध्ये वाढ झाल्यानं आणि कच्चा तेलाच्या दरातील किमतीमधील तेजीमुळं रुपयावरील दबाव वाढला आहे.
अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी करार लवकरच होईल असे संकेत आहेत. अमेरिकेच्या व्याज दरांतील कपाती संदर्भातील अनिश्चिततेमुळं गुरवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली होती. विदेशी गुंतवणूकदारांनी सातत्यानं विक्री केल्यानं आणि H-1B व्हिसाची फी वाढवल्यानं भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झालीय.
सोमवारी भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 7 पैशांनी घसरुन 87.60 रुपयांवर आला होता. सुरुवातीला रुपया 14 पैशांनी मजबूत झाला होता. या आर्थिक वर्षात रुपया 2.15 टक्क्यांनी घसरला आहे. तर, 2025 मध्ये 2.30 टक्क्यांनी घसरला आहे. ऑगस्टमध्ये भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 0.20 टक्क्यांनी मजबूत झाला होता.
बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार एलकेपी सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसिंडेंट रिसर्च अनालिस्ट जतिन त्रिवेदी यांच्या मतानुसार विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअरची विक्री करत आहेत. भारतीय शेअर बाजारात ते विक्रेते बनले आहेत. याचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. ट्रम्प टॅरिफ, एचवन बी व्हिसा संदर्भातील नियमांमुळं रुपया मजबूत होण्याची शक्यता कमी आहे.
पगार एक लाखांनी कसा वाढला?
डॉलर आणि रुपयातील घसरण तुम्ही पाहिली आहे. आता विचार करा भारतातील एखादा व्यक्ती अमेरिकेत 500000 अमेरिकन डॉलर्स पगारावर नोकरी करतो. म्हणजे रुपयाच्या 2.30 टक्के घसरणीपूर्वी भारतीय रुपयात त्याचा पगार 43,33,484 रुपये होता. आता सप्टेंबरपर्यंत 2.30 टक्के घसरण झाल्यानंतर त्याचा व्यक्तीचा पगार 1,02,016.5 रुपयांनी पगार 44,35,500 रुपये असेल. म्हणजेच पगारवाढ न होता त्या व्यक्तीचा भारतीय चलनातील पगार 1 लाख रुपयांनी वाढला.
आणखी वाचा
Comments are closed.