‘माझ्यासाठी काही बोलणे कठीण’ टीम मधून ड्रॉप झाल्यावर करुण नायर काय म्हणाला?

वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे (WI vs IND). रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर देवदत्त पडिक्कल (Devdatta padikal & N. Jagdishan) आणि एन. जगदीशन टीममध्ये आपली जागा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र, करुण नायरला (Karun Nair) फक्त एका मालिकेनंतर निवडकर्त्यांनी दुर्लक्षित केले आहे. इंग्लंड दौऱ्यावर करुणच प्रदर्शन खास लक्षात राहिलं नव्हतं. करुण चांगल्या सुरुवातीला मोठ्या कामगिरीत बदलण्यात अपयशी ठरला होता.

टीममधून ड्रॉप झाल्यानंतर करुण नायरचा पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने म्हटले, हो, मला निवडीची अपेक्षा होती. मला काही सांगता येत नाही आणि माझे शब्दच संपले आहेत. माझ्याकडे सांगण्यासाठी काही खास नाही. माझ्यासाठी उत्तर देणं खूप कठीण आहे. तुम्ही निवडकर्त्यांना विचारलं पाहिजे की, ते काय विचार करत आहेत. इंग्लंड दौऱ्यावर शेवटच्या कसोटीच्या पहिल्या डावामध्ये जेव्हा इतरांकडून कोणीही धावा केल्या नव्हत्या, तेव्हा मी अर्धशतक केले होते. त्यामुळे मला वाटलं की मी फलंदाजीमध्ये योगदान दिलं आहे.

Comments are closed.