Asia Cup Final: सूर्यकुमारवर PCB ने पेटवली ठिणगी, रविवारी पाकिस्तानला भारताचा कर्णधार देणार चोख प्रत्युत्तर?

आशिया कप 2025 स्पर्धेचा (Asia Cup 2025) अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववर अशी कारवाई केली आहे, ज्याचे उत्तर आता रविवारी फायनलमध्ये सूर्या (Suryakumar Yadav) स्वतःच्या पद्धतीने देईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात लीग स्टेजचा पहिला सामना झाला होता. हा सामना टीम इंडियाने 7 विकेटने जिंकला होता. मात्र, सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूशी हस्तांदोलन (handshake) केले नाही, यावरून मोठा वाद उभा राहिला. हे पीसीबीला अजिबात पसंत पडले नाही.

या घटनेनंतर आग पेटलेली असतानाच, सामना संपल्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये सूर्यकुमार यादवने हा विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना समर्पित केला. सूर्याच्या या विधानामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संतापला आणि त्यांनी आयसीसीकडे तक्रार केली. त्यानंतर आयसीसीने सूर्यकुमार यादववर कारवाई करत सामना शुल्काच्या 30 टक्के दंडाची शिक्षा सुनावली.

आशिया कप 2025 मध्ये सूर्यकुमार यादवची कामगिरी फारशी चमकदार राहिलेली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर केवळ 59 धावा होत्या. तर श्रीलंकेविरुद्धही तो फेल ठरला आणि फक्त 12 धावा करून बाद झाला.

आता आशिया कप 2025 फायनल सामना भारत-पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. 41 वर्षांमध्ये प्रथमच असा प्रसंग येत आहे की, भारत-पाक संघ आशिया कप फायनलमध्ये आमनेसामने भिडणार आहेत.
टीम इंडियाने आधीच या स्पर्धेत पाकिस्तानला दोन वेळा हरवून चकित केले आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा मात देऊन भारत आशिया कप 2025 चे विजेतेपद पटकावण्याच्या तयारीत आहे.

Comments are closed.