स्वामी चैतन्य आनंद यांना मोठा धक्का
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विद्यार्थिनींची छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या स्वामी चैतन्यानंद यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पटियाला उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच दिल्ली पोलिसांनीही त्यांच्याविरुद्ध महत्त्वपूर्ण कारवाई करत बँक खात्यांमधील तब्बल 8 कोटी रुपये इतकी रक्कम गोठवली आहे. हे 8 कोटी रुपये 18 बँक खात्यांमध्ये आणि 28 मुदत ठेवींमध्ये जमा करण्यात आले होते. हे पैसे आरोपी पार्थसारथी उर्फ बाबा चैतन्यानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टशी जोडलेले आहेत.
स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी यांच्यावर विद्यार्थिनींच्या छेडछाडीचा आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध कलम 319(2)/318(4)/336(3)/340(2)/61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. ते सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चैतन्यानंद वसंत कुंज परिसरातील एका खासगी व्यवस्थापन संस्थेचे संचालक म्हणून काम करत होते. ते सुमारे 12 वर्षांपासून येथील आश्रमात राहत होते.
Comments are closed.