ट्रम्प म्हणाले… शाहबाज महान नेते! व्हाइट हाऊसमध्ये शरीफ-मुनीर यांना पायघड्या

‘एच-1 बी’ व्हिसा शुल्कामध्ये एक लाख डॉलर्सपर्यंत वाढ, 50 टक्के टॅरिफ यामुळे हिंदुस्थान-अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. मात्र, दुसरीकरडे अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये चर्चेच्या फैरी सुरू आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये तब्बल 80 मिनिटे खलबते झाली. यावेळी ट्रम्प यांनी शरीफ यांचे काwतुक करताना चक्क महान नेते म्हटले.
संयुक्त राष्ट्र महासभेचे 80वे अधिवेशनासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख मुनीर हेही अमेरिकेत दाखल झाले. दोघांनी व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. सुमारे 80 मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. चर्चेनंतर प्रसिद्ध झालेल्या पह्टोत ट्रम्प हे हसत थम्बचा इशारा करताना दिसत आहेत. दरम्यान, या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी, ‘आज महान नेते येत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि त्यांचे लष्करप्रमुख हे चांगले लोक आहेत,’ अशी स्तुतिसुमने उधळली.
पहलगाम हल्ल्याचा हिंदुस्थानने राजकीय फायदा घेतला, शाहबाज यांचा आरोप
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून बोलताना हिंदुस्थानबद्दल फूत्कार काढले. युद्धात आम्ही जिंकलो, त्यांची सात विमाने पाडली असे सांगताना हिंदुस्थानचा उल्लेख त्यांनी शत्रूराष्ट्र असा केला. पहलगाम हल्ल्याचा हिंदुस्थानने राजकीय फायदा उठवला, असेही शाहबाज म्हणाले.
Comments are closed.