फ्रान्समध्ये हरियाणा तरुणांची हत्या झाली

वृत्तसंस्था/ कुरुक्षेत्र

हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिह्यातील एका तरुणाची फ्रान्समध्ये हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये 35 वर्षीय हरपाल सिंग हॅरी रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यापासून, पेहोवा येथील सातोडा गावातील कुटुंबातील सदस्यांना दु:ख होत आहे. त्याच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही. वादावादीतून हा प्रकार घडल्याचा दावा प्रथमदर्शनी करण्यात आला आहे. हरपाल सिंग हॅरी याचे कुटुंबीय या घटनेने हादरले असून दुतावासाच्या माध्यमातून ते फ्रान्समधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments are closed.