विंडीज संघाला मोठा धक्का, शमार जोसेफ दुखापतीमुळे हिंदुस्थानविरुद्धच्या कसोटी मालिकेबाहेर

आशिया कपनंतर हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यात रंगणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वीच विंडीज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शमार जोसेफ दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला असून, त्याच्या जागी नवोदित वेगवान गोलंदाज जोहान लेनला संधी देण्यात आली आहे.
हिंदुस्थानात 2 ते 14 ऑक्टोबरदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 2 ते 6 ऑक्टोबरदरम्यान रंगणार आहे. पण मालिकेच्या सुरुवातीच्या काही दिवसांपूर्वीच शमारची अनुपस्थिती जाहीर झाल्याने विंडीजच्या गोलंदाजीची ताकद कमी झाली आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. ‘शमार जोसेफ दुखापतीमुळे हिंदुस्थानविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या फिटनेस टेस्टचे आयोजन बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी केले जाईल,’ असे विंडीज बोर्डाने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले.
Comments are closed.