कोण जिंकलं, कोण हारलं सोडा, पण सूर्यकुमार यादवच्या ‘त्या’ कृतीने सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाण
आयएनडी वि एसएल एशिया कप 2025: भारत आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी रंगलेल्या आशिया चषक स्पर्धेचा सामना कमालीचा रंगतदार ठरला. भारतीय संघाने श्रीलंकेसमोर 203 धावांचे आव्हान उभे केले होते. मात्र, श्रीलंकेने पथुमा निसांकाच्या (Pathum Nissanka) वादळी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 202 धावा केल्या आणि हा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यामध्ये भारतीय संघाने बाजी मारली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार हे निश्चित झाल्याने श्रीलंकेविरुद्धच्या (Ind Vs SL) सामन्याकडे केवळ औपचारिकता म्हणून पाहिले जात होते. मात्र, हाच सामना संपूर्ण आशिया चषक स्पर्धेतील (Asia Cup 2025) चित्तथरारक सामना ठरला. मैदानात आणि मैदानाबाहेर घडलेल्या घटनांमुळे या सामन्याची सध्या प्रचंड चर्चा आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने मैदानात श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेल्लालागे(dunith wellalage) याची भेट घेतली. ही भेट पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
कालचा सामना संपल्यानंतर श्रीलंका आणि भारतीय संघातील खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. त्यावेळी श्रीलंकेचा दुनिथ वेल्लालागे हा सूर्यकुमार यादवच्या समोर आला. 18 सप्टेंबरला श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना सुरु होता. त्यावेळी अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी याने वेल्लागाथे याच्या एका षटकात पाच सिक्स मारले होते. त्यावेळी दुनिथ वेल्लालागे याचे वडील घरी टीव्हीवर हा सामना पाहत होते. आपल्या मुलाच्या एका ओव्हरमध्ये पाच सिक्स मारलेले पाहून त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांचे निधन झाले होते. ही घटना अनेकांच्या मनाला चुटपूट लावणारी ठरली होती. त्यामुळे सूर्यकुमार यादव याने काल दुनिथ वेल्लालागे समोर दिसताच त्याला प्रेमाने आलिंगन दिले. सूर्यकुमार यादव याने मोठ्या भावाच्या मायेने त्याला जवळ घेऊन त्याची विचारपासू केली. त्यानंतर सूर्याने दुनिथच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत त्याचे सांत्वन केले. सूर्यकुमार यादव बराचवेळ दुनिथ वेल्लालागे याच्याशी बोलत होता, अशी माहिती श्रीलंकेचे प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी दिली. यानंतर सोशल मीडियावर सूर्यकुमार यादव आणि दुनिथ वेल्लालागे यांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या कृतीबद्दल नेटकऱ्यांकडून सूर्यकुमार यादव याचे कौतुक केले जात आहे.
हा क्षण #Sonsportsnetwork #Dpworldasiacup2025 #Indvsl pic.twitter.com/redvyd02p
– सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (@sonsportsnetwk) 26 सप्टेंबर, 2025
आणखी वाचा
श्रीलंकेचा शनाका आऊट की नॉट आऊट? सुपर ओव्हरमधला सुपर ड्रामा… पण नियम काय सांगतो?
आणखी वाचा
Comments are closed.