तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली, फोटोग्राफर तरुणीसह मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबलं अन् शरीरसुखाची म

द्रुत वाचन दर्शवा

एआय द्वारे व्युत्पन्न केलेले मुख्य मुद्दे, न्यूजरूमद्वारे सत्यापित

नाशिक गुन्हेगारी बातम्या: नाशिक शहरातील म्हसरूळ (Mhasrul) परिसरात एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणी व तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये जबरदस्तीने डांबून, पिस्तुलाचा धाक दाखवत अनैतिक व्यवसाय करण्याबाबत सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात हॉटेलचालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nashik Crime News)

सुमारे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत पीडित तरुणीने सुरुवातीला भीतीपोटी तक्रार केली नव्हती. मात्र, आरोपीकडून पुन्हा धमक्या आल्यानंतर अखेर तिने पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित हॉटेल चालक सौरभ संजय देशमुख आणि त्याचा साथीदार वेटर मोहीत मिलिंद ताम्हाणे यांना अटक केली. नाशिक जिल्हा न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हॉटेलचालकाचा इतिहास (Nashik Crime News)

संशयित सौरभ देशमुख याचे ‘कॅटल हाउस’ नावाचे हॉटेल असून, त्याच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर कृत्यांबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे सौरभ हा एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याच्याकडून हॉटेलमध्ये अनेकदा अनैतिक व गैरकायदेशीर व्यवहार होत असल्याच्या तक्रारी असून, पोलिसांपासून बचावासाठी तो आणि त्याचे कर्मचारी वैयक्तिक वॉकी-टॉकी वापरत असल्याचेही उघड झाले आहे.

धमक्यांची मालिका व शरीरसुखाची मागणी (Nashik Crime News)

पीडित तरुणी आणि तिच्या मैत्रिणीचा वेटर मोहीत ताम्हाणेशी पूर्वीपासूनच परिचय होता. त्याने 2020 पासून त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती. एके दिवशी तो ‘कॅटल हाउस’ हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर त्या दोघी व त्यांचा एक मित्र तिथे गेले. तेव्हा हॉटेलमालक सौरभ देशमुख याने त्यांना थेट धमकी देत म्हटले की, “तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली आहे. माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स पुरवल्या जातात, आता तुम्ही दोघीही तेच काम करा. चांगले पैसे देईन, आणि मोहीतकडून पैसे मागण्याची गरजही भासणार नाही,” असे म्हटले.

पिस्तुलाचा धाक व पैशांची लुट (Nashik Crime News)

या अनपेक्षित आणि धक्कादायक प्रसंगानंतर तिघांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशमुख याने त्यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांना बंद खोलीत डांबून ठेवले. एवढ्यावरच न थांबता त्याने जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या जवळील 21 हजार रुपये काढून घेतले. अखेर पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले.

पुन्हा धमकीचे व्हॉट्सॲप मेसेज (Nashik Crime News)

प्रकरण तिथेच संपले नाही. काही दिवसांनी मोहीत ताम्हाणे याने व्हॉट्सॲपवरून पुन्हा धमकीचे मेसेज पाठवले. त्यामुळे पीडित तरुणींनी अखेर धैर्य करून पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी विनयभंग, जबरदस्ती, डांबून ठेवणे, दरोडा, धमकी देणे अशा विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात देशमुख व ताम्हाणे यांच्यावर पूर्वीही असेच आरोप असल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Nashik News : चिमुकलीला सहिसलामत वाचवलं, पण मूक महिलेचा शॉक लागून दुर्दैवी अंत, दोन लेकरांचं आयुष्य पोरकं; नाशिकमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

आणखी वाचा

Comments are closed.