आई मंदिराबाहेर फुलं विकते, बाप ग्राऊंड बॉय, भारताच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या श्रीलंकेच्या न
पथम निसांका इंडिया विरुद्ध श्रीलंका कोण आहे: पथुम निसांका… कालपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूचे नाव फार मोजक्या जणांना माहिती होते. अनेकांना फक्त एवढंच माहिती होतं की, श्रीलंकेसाठी निसांका नावाचा एक फलंदाज सलामीला उतरतो. पण 26 सप्टेंबर 2025 हा दिवस आला आणि सगळं बदललं. आशिया कप 2025 मध्ये श्रीलंकेची टीम भारतासमोर उभी होती. पण त्यांना सामना जिंकता आला नाही, मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना पथुम निसांका याने धुमाकूळ घातला, ज्याने भारताच्या गोलंदाजांची धू धू धुलाई केली आणि अवघ्या 58 चेंडूत 184.48 च्या स्ट्राईक रेटने 107 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने सात चौकार आणि सहा गगनचुंबी षटकार मारले. या दमदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ हा पुरस्कारही मिळाला, पण तुम्हाला माहिती आहे का? निसांका किती गरीब होता आणि कहाणी. चला जाणून घेऊया….
आई मंदिराबाहेर फुलं विकते, बाप ग्राऊंड बॉय
खरंतर, आज जो पथुम निसांका क्रिकेटचं मैदान गाजवत आहे, त्याचं बालपण प्रचंड कठीण परिस्थितीत गेलं. तो खूप गरीब होता. 1998 साली जन्मलेल्या पथुम याचे वडील ग्राउंड बॉय म्हणून काम करायचे. घरची आर्थिक स्थिती एवढी वाईट होती की, आईला मंदिराबाहेर फुलं विकावी लागायची. पण म्हणतात ना डोळ्यासमोर ध्येय असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येऊ शकते. पथुम निसांका चिकाटीने प्रयत्न करत राहिला. शालेय जीवनापासूनच त्याला क्रिकेटचा ध्यास होता. त्याचाच फायदा त्याला मिळाला. आणि आज फुलं विकणाऱ्या त्या आईचा मुलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर इतका मोठा पराक्रम करून दाखवला आहे.
पथुम निसांकाने रचला इतिहास
भारत विरुद्धच्या सामन्यात निसांकाने केवळ शतक झळकावलं नाही, तर दुबईत एक मोठी कामगिरीही आपल्या नावे केली. तो श्रीलंकेकडून टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी ही विशेष कामगिरी माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशानच्या नावे होती. दिलशानने श्रीलंकेसाठी एका टी-20 सामन्यात 104 धावांची शतकी खेळी केली होती. पण निसांकाने मागच्या सामन्यात 107 धावा ठोकत त्याचा विक्रम मोडला.
दुसर्या-आतापर्यंत T टी 20 मध्ये #ASIACUP – धनुष्य घ्या, पथम निसांका 🔥🙌
पहा #Dpworldasiacup2025 – लाइव्ह वर #Sonyliv आणि #Sonsportsnetwork टीव्ही चॅनेल 📺#Asiacup2025 #Indvsl pic.twitter.com/qyxnwingvr
– सोनी लिव्ह (@सोनी लाइफ) 26 सप्टेंबर, 2025
कोहली आणि राहुलचा विक्रम मोडला
या सामन्यात पथुम निसांका आणि कुसल परेरा या जोडीने टी20 फॉरमॅटमधील आशिया कपमध्ये सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी रचली. आशिया कप (टी20 फॉरमॅट) मध्ये ही कोणत्याही विकेटसाठी झालेली सर्वात मोठी भागीदारी ठरली. याआधी हा विक्रम विराट कोहली आणि के. एल. राहुल यांच्या नावे होता. त्यांनी 8 सप्टेंबर 2022 रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सुपर-4 सामन्यात पहिल्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली होती. टी-20 आशिया कपमध्ये 100+ भागीदारी करणारी तिसरी जोडी पाकिस्तानची उमर अकमल आणि शोएब मलिक यांची आहे. त्यांनी 29 फेब्रुवारी 2016 रोजी यूएईविरुद्ध चौथ्या विकेटसाठी नाबाद 114 धावांची भागीदारी केली होती.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.