अमेरिकेत 11 वर्ष कामाचा अनुभव असलेला तरुण हिंदुस्थानात बेरोजगार, नोकरीसाठी करतोय धडपड

अमेरिकेसारख्या देशात काम करूनही एका हिंदुस्थानी तरुणाला मायदेशात नोकरी मिळत नाहिये. या तरुणाने सोशल मीडियावर आपला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.
अमेरिकेत काम करून पुन्हा मायदेशी म्हणजेच हिंदुस्थानात नोकरीच्या शोधात आलेल्या एका व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या व्यक्तीने त्यासंदर्भात Reddit नावाच्या एका सोशल मीडिया अॅपवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अमेरिकेतून 11 वर्षांचा अनुभव घेऊन पुन्हा हिंदुस्थानात नोकरीसाठी आल्यावर केलेल्या संघर्षाबद्दल सांगितले आहे.
r/returnToIndia या नावाने त्या व्यक्तीचे प्रोफाईल आहे. नोकरीच्या शोधात हा व्यक्ती पुढील महिन्यात बंगळुरूला जाण्याची तयारी करत आहे. यापूर्वी त्याने 11 वर्षांचा विदेशातील नोकरीचा अनुभव असून हिंदुस्थानात नोकरी मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केलाय. “मी काय चूक करत आहे? माझे naukri.com वर तसेच LinkedIn bj प्रोफाइल आहे, इतकच नाही तर मी करिअर संदर्भातील वेबसाइटवर नोकऱ्यांसाठी अर्जही करतो, पण याचा काहीच फायदा होत नाहीए, असे तो म्हणाला.
अमेरिकेत 11 वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर नोकरी करण्यास असमर्थ
द्वारा मध्येरिटर्नटोइंडिया
पीडित व्यक्तीने सांगितलेल्या माहितीनुसार, यापूर्वी त्याने सल्लागार आणि वित्त कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तो हिंदुस्थानातही अशाच प्रकारच्या पदांच्या शोधात होता. परंतु प्रयत्नांची पराकाष्टा करूनही त्याला नोकरी मिळाली नाही. याच रागातून त्याला स्वत: इजा करण्याचाही प्रयत्न केला. मला पूर्णपणे अपयश आल्यासारखे वाटत आहे. मी सध्या अमेरिकेत आहे, पण पुढच्या महिन्यात बंगळुरूला जात आहे, असे त्याने सांगितले.
Comments are closed.