Asia Cup: भारत पाक अंतिम सामन्यात टीम इंडिया पाकिस्तान खेळाडूंसोबत हँडशेक करणार का? जाणून घ्या सविस्तर

आशिया कप 2025 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात (28 सप्टेंबर) रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया सध्या शानदार फॉर्म मध्ये दिसत आहे आणि त्यांनी आधीच पाकिस्तानला 2 वेळा पराभूत केले आहे. आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामन्यात नेहमीच वादाची झळ पाहायला मिळाली आहे. वादाची सुरुवात (14 सप्टेंबर) रोजी खेळलेल्या पहिल्या सामन्यात टॉसच्या दरम्यान झाली होती. टॉसच्या वेळी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आगा सोबत हात नाही मिळवला.

यानंतर टीम इंडियाने सामना जिंकला तरी त्यांनी कोणत्याही पाकिस्तान खेळाडूसोबत हात मिळवला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डला टीम इंडियाची ही कृती पटली नाही आणि यावर अजूनही वाद सुरू आहे. सुपर-4 मध्ये एकदा पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांचा सामना झाला आणि या सामन्यातही टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हात नाही मिळवला. यानंतर आता मोठा प्रश्न उभा आहे की, फाइनलमध्येही ही हँडशेक कंट्रोव्हर्सी पाहायला मिळेल का?

आशिया कप 2025 सुरू होण्यापूर्वीच भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबतीत वादाचे वातावरण पाहायला मिळाले होते. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील लोकांमध्ये पाकिस्तानविरुद्ध मोठा राग निर्माण झाला आहे आणि अनेक लोकांबरोबरच माजी क्रिकेटपटूंनीही आशिया कप 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा बहिष्कार केला होता. तरीही सामना खेळवला गेला, पण टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हात नाही मिळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुढील सामन्यातही हेच दृश्य पाहायला मिळाले होते. आता फाइनलमध्येही काहीतरी असेच दृश्य पाहायला मिळू शकतात.

पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला होता की भारतीय संघ हा विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी गेलेल्या लोकांना समर्पित करत आहेत, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ही गोष्ट इतकी चुकीची वाटली की त्यांनी सूर्या कडून भारतीय कर्णधाराची देशभक्ती पहावली नाही आणि याची तक्रार आयसीसीकडे केली. त्यानंतर आयसीसीनेही सूर्यकुमार यादववर सामन्याच्या फीचा 30% दंड ठोठावला आहे. बीसीसीआयने आयसीसीच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे.

Comments are closed.